Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

अतिक्रमणावर तोडगा काढून राष्ट्रीय महामार्गाचे काम तातडीने पूर्ण करण्याचे खा. अशोक नेते यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकाऱ्यांची बैठक

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गोंदिया,२९ जानेवारी : देवरी ते आमगाव, आमगाव ते गोंदिया तसेच देवरी- चिचगड- कोरची या महामार्गाचे काम अजूनही अपूर्ण आहे. तसेच आमगाव शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील अतिक्रमणावर अजूनही तोडगा काढण्यात आलेला नाही, याकडे गांभीर्याने लक्ष देऊन अपूर्ण कामे यथाशिघ्र मार्गी लावून अतिक्रमनावर तातडीने तोडगा काढून राष्ट्रीय महामार्गाचे काम तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश भाजपचे अनुसूचित जनजाती मोर्चा चे राष्ट्रीय महामंत्री तथा खासदार अशोक नेते यांनी दिले.

खासदार अशोक नेते यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी  28 जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, गोंदिया येथे राष्ट्रीय महामार्ग, सार्वजनिक बांधकाम विभाग, जिप बांधकाम विभाग, व अन्य अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीला प्रामुख्याने जिल्हाधिकारी नयना गुंडे, ब्रम्हपुरीचे माजी आमदार प्रा. अतुलजी देशकर, आमगाव चे शहर अध्यक्ष घनश्याम अग्रवाल, भाजपचे यशवंत मानकर,  , मुख्य कार्यकारी अधिकारी, उप जिल्हाधिकारी, भाजयुमो चे प्रदेश सदस्य हितेश डोंगरे, जिल्हा नियोजन अधिकारी, राष्ट्रीय महामार्ग चे अधिकारी, उप कार्यकारी अभियंता, व अन्य अधिकारी उपस्थित होते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

बाम्हणी रस्ता तसेच सालेकसा तालुक्यातील धानोली रेल्वे स्टेशन वरील अंडर ब्रिज यासंदर्भात असलेल्या अडचणी दूर करून या कामाचे प्रस्ताव तातडीने रेल्वे विभाग व वरिष्ठांकडे सादर करून सदर काम तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश खासदार अशोक नेते यांनी दिले. तसेच आमगाव नगर पंचायत अंतर्गत विकास कामे यथाशिग्र पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. तसेच सालेकसा तालुक्यातील कचारगड देवस्थानच्या विकासासाठी केन्द्र शासनाकडून 21 कोटी रुपयांचा निधी मंजूर झालेला आहे. या निधीतून कचारगड तीर्थक्षेत्रातील विकासकामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश यावेळी खासदार अशोक नेते यांनी अधिकाऱ्यांना दिले.

हे देखील वाचा ,

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

विद्यार्थ्यांनी नोकरी शोधण्याऐवजी रोजगार निर्माण करणारे बनले पाहिजे : केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री सुभाष सरकार

“शाब्बास.. दिल्लीत महाराष्ट्राचा झेंडा फडकवलात…!” मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून राष्ट्रीय छात्रसेनेच्या चमुचे अभिनंदन

शॉर्ट सर्किटमुळे १२ वर्षीय मुलाचा मृत्यू; पतंग उडविणे बेतले जीवावर

त्रिवेणी अर्थमूव्हर्स कंपनीच्या संचालकास मारहाण केल्याप्रकरणी आ. धर्मरावबाबांच्या जावयासह ६ जणांवर गुन्हे दाखल

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.