Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

शॉर्ट सर्किटमुळे १२ वर्षीय मुलाचा मृत्यू; पतंग उडविणे बेतले जीवावर

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

चंद्रपूर, दि. २८ जानेवारी : वरोरा येथील बोर्डा गावातील काही लहान मुले घराच्या मागे असलेल्या पायऱ्यांवर उभे राहुन पतंग उडवत असताना अचानक उच्च दाबाच्या ताराला पतंग अडकल्याने मोठा आवाज होत शॉर्ट सर्किट झाला, त्या मध्ये पतंग उडविणारा आदित्य उमेश येटे (१२) हा गंभीरपणे भाजला गेला. हि  घटना आज सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास घडली आहे.

शॉर्ट सर्किट इतका मोठा झाला की जवळ पास असलेले घराचे मीटर सुद्धा जळाले. यामुळे येथील सर्व नागरिकांची घराबाहेर गर्दी जमली. व शॉर्ट सर्किट मध्ये भाजून गेलेला उमेश येटे (१२) याच्याकडे सर्वांनी धाव घेतली. त्याला लगेच त्यांच्या कुटुंबीयांनी उपचार करिता रुग्णालयात दाखल केले. परंतु उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे देखील वाचा : 

भाजपच्या “त्या” १२ आमदारांवर विधानसभा अध्यक्ष व विधीमंडळ सचिवालय योग्य तो निर्णय घेईल – जयंत पाटील

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभागाद्वारे राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांचा नागरिकांनी लाभ घ्यावा

 

 

Comments are closed.