Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभागाद्वारे राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांचा नागरिकांनी लाभ घ्यावा

- सहाय्यक आयुक्त समाज कल्याण, गडचिरोली यांचे आवाहन.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

गडचिरोली, दि. 28 जानेवारी : इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती इतर मागास वर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमातीच्या समाजातील तळागाळातील, अशिक्षित तसेच ग्रामीण भागातील शेवटच्या घटकापर्यंत पुरेशी माहिती पोचत नसल्याने समाजातील नागरिक अपेक्षित लाभांपासून वंचित राहु नये व संबंधितांना योजनेची माहिती मिळावी या करीता समाज कल्याण विभागाच्या कार्यालयाद्वारे ग्रामीण व शहरी भागातील इमाव, विमाप्र तसेच विजाभज प्रवर्गातील घटकांसाठी पुढील प्रमाणे विविध योजना राबविण्यात येतात. सदर योजनांच्या सविस्तर माहितीसाठी व योजनेच्या शासन निर्णयासाठी https://www.maharashtra.gov.in/1145/Government-Resolutions या संकेतस्थळावर भेट द्यावी किंवा कार्यालय, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण गडचिरोली येथे संपर्क करावे असे आवाहन करण्यात आले आहे.

सहाय्यक आयुक्त समाज कल्याण, गडचिरोली या कार्यालयाद्वारे राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची नावे पुढीलप्रमाणे आहेत. (विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागस वर्ग व विशेष मागास प्रवर्ग).

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

Maha DBT पोर्टल- भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजना, शिक्षण शुल्क, परिक्षा शुल्क (फ्रिशिप) योजना., वस्तीगृह योजना (विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागस वर्ग व विशेष मागास प्रवर्ग), वसंतराव नाईक तांडा/वस्ती सुधार योजना., यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना, धनगर समाज बांधवाच्या विकासासाठी विविध योजनामध्ये ( भटक्या जमाती- क प्रवर्ग), अ) केंद्राच्या स्टँड अप इंडिया योजनेअंतर्गत धनगर समाजातील महिलांकरीता मनी मार्जिन योजना, ब) धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना शहरातील इंग्रजी माध्यमाच्या नामंकित निवासी शाळांमध्ये शिक्षण, क) धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी स्वयंम योजना, ड) धनगर समाजासाठी घरे बांधण्याची योजना, विजाभज प्रवर्गातील मुलांकरीता आश्रमशाळा, कन्यादान योजना वरील योजनांच्या संबंधाने अधिक माहितीसाठी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयाशी संपर्क साधावा असे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण, गडचिरोली यांनी कळविले आहे.

हे देखील वाचा : 

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

गडचिरोलीत कोरोनां संसर्गाच्या रुग्णांत वाढ ,तीन शतकाहून अधिक रुग्ण संख्येत एकाच दिवशी वाढ

07 फेब्रुवारी रोजी लोकशाही दिनाचे आयोजन

त्रिवेणी अर्थमूव्हर्स कंपनीच्या संचालकास मारहाण केल्याप्रकरणी आ. धर्मरावबाबांच्या जावयासह ६ जणांवर गुन्हे दाखल

 

Comments are closed.