Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

कोलामार्का आरक्षित वनक्षेत्रातील वृक्षतोडीची होणार चौकशी; उपवनसंरक्षकांनी दिले आदेश

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

 

गडचिरोली : सिरोंचा वनविभागांतर्गत येणाऱ्या अहेरी तालुक्यातील कमलापूर वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या कोलामार्का संवर्धन आरक्षित क्षेत्रात अवैधरीत्या वृक्षतोड करून वनसंपदा नष्ट केली जात आहे. या गंभीर प्रकाराकडे वनविभागाने लक्ष घातले असून उपवनसंरक्षक सुमित कुमार यांनी चौकशीचे आदेश दिले आहे.

गडचिरोली हा जंगलाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. जिल्ह्यातील काही वनक्षेत्र प्राण्यासाठी आरक्षित करण्यात आले आहे. मात्र, वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या दुर्लक्षपणामुळे आरक्षित क्षेत्रातील झाडांची मोठ्या प्रमाणात कटाई होत असल्याचे चित्र दिसत आहेत.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

असाच एक प्रकार सिरोंचा वनविभागांतर्गत येणाऱ्या कोलामार्का संवर्धन आरक्षित क्षेत्रात पुढे आला आहे. या क्षेत्रातील जंगल प्राण्यांसाठी आरक्षित ठेवण्यात आला आहे. मात्र या आरक्षित क्षेत्राच्या संवर्धनाकडे वनविभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. यामुळे या क्षेत्रातील झाडांची अवैधरीत्या तोडणी करीत वनसंपदेचे नुकसान केले जात आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

आता या प्रकाराकडे वनविभागाने लक्ष घातले असून सिरोंचा वनविभागाचे उपवनसंरक्षक सुमित कुमार यांनी प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहे. यासाठी वनकर्मचाऱ्यांचे पथकसुद्धा तयार करण्यात आले असल्याची माहिती प्राप्त आहे.

३० दिवसांत मिळणार माहिती

कमलापूर वनपरिक्षेत्र कार्यालयांतर्गत येणाऱ्या कोलामार्का संवर्धन आरक्षित क्षेत्रात वृक्षतोड करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. प्रकरणाच्या तपासणीसाठी वनकर्मचाऱ्यांचे पथक गठीत करण्यात आले आहे. या संपूर्ण प्रकरणाची माहिती ३० दिवसांत मिळणार.

सुमित कुमार – उपवनसंरक्षक,  सिरोंचा वनविभाग 

कोलामार्का जंगल राखीव

संपूर्ण राज्यात कोलामार्का हा एकमेव असा वनक्षेत्र आहे. जो रान म्हशींसाठी आरक्षित ठेवण्यात आला आहे. हा क्षेत्र १८०.७२ चौ. किमी आहे. तसेच गडचिरोली जिल्ह्यातील या क्षेत्रात रान म्हशींचे अस्तित्व आहे. राज्यात एकमेव कोलामार्का वनक्षेत्र आरक्षित असूनही सर्वाधिक वृक्षतोड होतानाचे चित्र दिसून येत आहेत. या गंभीर प्रकाराकडे वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे.

शिकार होण्याची शक्यता

या क्षेतात मागील काही दिवसांपासून अवैधरीत्या वृक्षतोड स्रुरू आहे. यामुळे या क्षेत्रात असलेल्या रान म्हशींची शिकार होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. एकीकडे वनविभागाचे अधिकारी जंगलाचे संरक्षण व संवर्धन करण्याचे सांगत आहेत. तर दुसरीकडे वनविभागाचे अधिकारीच जंगलाचे संरक्षण करण्याकडे दुर्लक्ष करीत आहेत.

हे देखील वाचा :

सुरजागड मार्गावर नक्षल्यांनी झाड पाडून मार्ग केला बंद; नक्षली पत्रके आढळली

भामरागड- लाहेरी मार्गावर आढळले नक्षली पत्रके व बॅनर, नक्षल सप्ताह पाळण्याचे केले आवाहन

नक्षल्यांनी पुकारलेल्या बंदला कोरचीत १०० टक्के प्रतिसाद

टोकियो ऑलिंपिक्स २०२०: भारताची हॉकी, तिरंदाजी, बॉक्सिंग, बॅडमिंटन मध्ये उत्साहवर्धक कामगिरी,पदकाच्या आशा वाढल्या

 

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.