Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

बचतगटातील महिलांच्या शेतमालाला जागतिक बाजारपेठेसाठी वर्ल्ड एक्सपो दुबई येथे ‘माविम’चे कंपन्यासोबत सामंजस्य करार –  महिला व बाल विकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांची माहिती

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

मुंबई डेस्क, दि. १ डिसेंबर : महिला आर्थिक विकास महामंडळ आपल्या ई-बिझनेस प्लॅटफॉर्मद्वारे महिला सक्षमीकरणासाठी काम करत असून त्यासाठी बाजारपेठेतील संबंध विकसित करण्याचा प्रयत्न करत आहे. त्याच्या अनुषंगाने, वर्ल्ड एक्स्पो, दुबई येथे ‘माविम’ ने एलबीआय जनरल ट्रेडिंग एलएलसी, बीबी ग्लोबल एफझेडई आणि सॅन बॅन बिझनेस कमर्शियल इन्व्हेस्टमेंट एलएलसी सोबत तीन सामंजस्य करारांवर स्वाक्षरी केली आहे, अशी माहिती महिला व बाल विकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिली आहे.

महिला आर्थिक विकास महामंडळने स्त्रियांच्या सक्षमीकरणासाठी बचतगटासारख्या माध्यमांचा उपयोग केला आहे. ‘मविम’ ही राज्यातील महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी काम करणारी त्यांना सक्षम करणारी, महत्त्वाची यंत्रणा आहे. बचतगटाच्या महिलांच्या शेतमालाला बाजारपेठ व उत्कृष्ट दर मिळवून देण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब केला जात आहे.
महिला व बाल विकास मंत्री ॲड. ठाकूर म्हणाल्या, या सामंजस्य कराराद्वारे, महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांतील महिला शेतकऱ्यांकडून कृषी मालाच्या खरेदीवर लक्ष केंद्रित केले जाईल. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांतील महिला शेतकऱ्यांकडून सुमारे ४२,००० टन कृषी माल खरेदी होईल.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

या भागीदारीमुळे कांदा, तांदूळ, ताजी फळे आणि भाजीपाला या उत्पादनांसाठी जागतिक बाजारपेठ उपलब्ध होईल. या सामंजस्य करारामुळे महिला शेतकऱ्यांसाठी जागतिक बाजारपेठेत आपला कृषी माल पोहोचण्यासाठी संधी मिळणार आहे. या तीन सामंजस्य करारांचे मूल्य जवळपास ६० ते ६५  कोटी  असण्याची अपेक्षा आहे, ज्याचा राज्यभरातील ५० हजार महिला शेतकऱ्यांना फायदा होईल.

ग्रामीण महिलांचे संघटन, त्यांची क्षमता बांधणी, उद्योजकता विकास यासाठी ‘माविम’कडून काम केले जाते. या सामंजस्य करारामुळे बचतगटाच्या महिलांच्या शेतमालाला जागतिक बाजारपेठ मिळाली याचा आनंद आहे, अशी प्रतिक्रिया ‘माविम’ च्या अध्यक्षा ज्योती ठाकरे, यांनी  या सामंजस्य कराराबाबत व्यक्त केली.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

यावेळी  ‘माविम’च्या व्यवस्थापकीय संचालक श्रद्धा जोशी  उपस्थित होत्या.

हे देखील वाचा : 

शिक्षकाने सातव्या वर्गातील विद्यार्थीनीचा केला विनयभंग!

कौटुंबिक न्यायालय परिसरात पतीने पाडला पत्नीचा दात

सार्वजनिक ठिकाणी मास्क असलेल्या व कोरोना लसीकरण झालेल्यांनाच प्रवेश

Comments are closed.