Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

बेतकाठी येथील बंद असलेली दूरसंचार सेवा पूर्ववत सुरू करा, सरपंच कुंतीबाई हुपुंडी यांची मागणी..

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली दि.२७ ऑगस्ट : कोरची तालुक्यापासून १५ किमी अंतरावरील बेतकाठी येथील दूरसंचार सेवा मागील सहा महिन्यापासून बंद असल्याने दूरसंचार सेवा  कोलमडली असून त्या विभागातील यांत्रिक सामग्री बॅटरी व पावर प्लॅंटसह पूर्णपणे निकामी झाली असल्याची प्रथामीक माहिती आहे.

कोरची तालुक्यातील बेतकाठी हे गाव अतिशय दुर्गम भागात असून या गावाला बरेच गावे जोडलेली आहेत. या ठिकाणी बीएसएनएलची एकमेव सेवा उपलब्ध असल्याने त्यावरच अवलंबून राहावे लागत होते. मात्र दूरसंचार सेवा  बंद असल्याने मोठी अडचण निर्माण झाली आहे. देशात सध्या कोरोनाच सावट आहे.  तसेच पावसाळ्याचे दिवस सुरु आहेत  तर काही विद्यार्थी ओनलाईन शिक्षण घेत आहेत . विद्यार्थ्यांचे एडमिशनची कामे  सुरु  झाले असून  दूरसंचार सेवा अधीक महत्वाची असताना  पूर्णता दूरसंचार निगमच्या अधिकार्यांनी  दुर्लक्ष केल्याने रोष व्यक्त केल्या जात आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

कुठल्याही गोष्ठीसाठी आज दूरसंचार सेवा अतिशय महत्वाची आहे. आणि या भागात कार्यरत असलेली बीएसएनएलची एकमेव सेवा कुचकामी ठरल्याने  या परिसरातील व्यापारी आणि सर्वसामान्य नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो आहे.

एका बाजूला जग नेट कॅनेक्टीव्हितीने जुळले असून प्रेत्येक काम डिजिटल झाले असल्याने घरबसल्या मिळण्याची सोय झाली असली तरी या भागात दूरसंचार सेवा कुचकामी ठरली आहे .शासकीय  प्रत्येक काम हे डिजिटल झाले आहे ,बॅक, प्रशासकीय काम, शेतकऱ्यांची सातबारा ,इतर  कागदपत्र  प्राप्त करण्यासाठी दूरसंचार सेवा  महत्वाची आहे मात्र बेतकाठी परिसरात बंद असल्याने मोठ्या अडचणीला तोंड द्यावे लागत  आहे .

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

यासाठी वेळोवेळी  दूरसंचार निगमच्या वरिष्ठ अधिकार्यांना लक्ष घालून दूरसंचार सेवा पुर्ववत  चालू करण्याची मागणी निवेद्नातून  केली आहे . याशिवाय दूरसंचार सेवा चालू करण्यासाठी जिल्हाधिकारी यांनाहि  बऱ्याच वेळा निवेदन देण्यात आले आहे. मात्र काहीच फायदा झाला नाही.

त्यामुळे बेतकाठी परिसरातील जनतेची अडचण लक्षात घेऊन प्रशासनाने तातडीने सेवा सुरू करावे अशी मागणी बेतकाठी ग्राम्पांच्यातच्या  सरपंच कुंतीबाई हुपुंडी यांनी निवेदनातून मागणी  केली आहे.

हे देखील वाचा,

भामरागड उपवनसंरक्षक आशिष पांडे यांच्या असभ्य वार्तालाप, मुजोरीमुळे वनकार्यालयीन कर्मचाऱ्यांनी एक दिवसीय रजेवर राहून पुकारला एल्गार

अन..त्याच तिकीट मशीनचा एसटीत वाहका हातात झाला स्फोट ..आऊट डेटेट तिकीट मशीनच ठरली बॉम्ब

काबुल विमानतळाबाहेर आत्मघाती हल्ला

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.