Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

धक्कादायक!! गॅस गळतीमुळे एकाच कुटुंबातील ६ जणांचा दुर्दैवी मृत्यू!

चंद्रपुरच्या दुर्गापुर येथील एकाच परिवारातील ६ जणांचा मृत्यु झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

चंद्रपुर :  जनरेटर धूर गळतीमुळे एकाच परिवारातील ६ जणांना आपले प्राण गमवावे लागले आहे. कंत्राटदार रमेश लष्कर सहित कुटुंबातील ६ जणांचा जनरेटर धूर गळतीमुळे मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना दुर्गापूर येथे घडली आहे.

मृतकांमध्ये लहान मुलांचा देखील समावेश आहे. मृतकांमध्ये अजय लष्कर (२१), रमेश लष्कर (४५), लखन लष्कर (१०), कृष्णा लष्कर (८), पूजा लष्कर (१४), माधुरी लष्कर (२०) यांचा समावेश आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

दहा दिवसांपूर्वी या कुटुंबात विवाह झाला होता. दरम्यान डॉक्टर विषबाधेमुळे मृत्यु झाल्याचे सांगत आहे. रात्री दुर्गापुरातील काही भागातील वीज पुरवठा गेल्याने रमेश यांनी जनरेटर सुरू केला, वीज न आल्याने जनरेटर सुरूच होता, रात्री पाऊस सुरू झाल्याने जनरेटर सुद्धा घराच्या आतील भागात ठेवण्यात आला असल्याने त्यामधून निघणारा धूर लष्कर कुटुंबासाठी जीवघेणे ठरले.

त्या धुरामुळे ६ जणांचा गुदमरून मृत्यू झाल्याची माहिती पुढे आलेली असून कुटुंबातील १ सदस्य यामधून बचावला असून त्यांचेवर डॉक्टर विश्वास झाडे यांच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

या घटनेची माहिती पोलीस विभागाला प्राप्त होताच घटनास्थळी दुर्गापूर पोलीस दाखल झाले असून पुढील तपास सुरु आहे.

हे देखील वाचा :

“त्या” अवैध दारू विक्रेता, सावकारापुढे पोलीस यंत्रणा हतबल ठरतेय का?

वनपरिक्षेत्र अधिकारी आणि लिपिकावर निलंबनाची टांगती तलवार!; वनकर्मचाऱ्यांनी दस्ताऐवजासह केली लेखी तक्रार

१९ वर्षीय तरुणाने दुचाकीसह तलावात उडी घेऊन केली आत्महत्या!

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.