Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

राज्यात डिसेंबरपूर्वी ५२०० जागांवर होणार पोलीस भरती – गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची घोषणा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

औरंगाबाद : राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील सध्या औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. औरंगाबाद येथे गृहमंत्र्यांनी पत्रकारांशी संवाद साधतांना यावेळी मोठी घोषणा केली आहे. महाराष्ट्र पोलीस दलात एकूण 12 हजार 200 पदांची भरती केली जाईल, अशी माहिती त्यांनी दिली आहे.

पहिल्या टप्प्यात कोणत्याही परिस्थितीत 31 डिसेंबर पूर्वी 5200 पदांची भरती करणार असून त्यानंतर 7 हजार पदे भरले जातील अशी माहिती दिलीप वळसे पाटील यांनी दिली.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

डिसेंबर पूर्वी 5200 जागांवर भरती

दिलीप वळसे पाटील यांनी महाराष्ट्र पोलीस दलात डिसेंबरपूर्वी 5200 जागांवर भरती केली जाईल, अशी घोषणा केली. तर, उर्वरित 7 हजार पदांची भरती नंतर केली जाईल अशी माहिती दिली. औरंगाबाद येथे पोलीस दलाच्या अनुषंगानं विविध मुद्यांवर त्यांनी भाष्य केलं.

मृत कर्मचाऱ्याच्या पाल्याला नोकरी

कोविडमध्ये ज्या पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला त्यांच्या पाल्यांना नोकरी देण्याचं धोरण स्पष्ट आहे. काही ठिकाणी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. 50 लाख देण्याचं काम पूर्ण झालं आहे. जे राहीले आहेत  त्यांना पण तातडीने मदत केली जाईल, अशी माहिती वळसे पाटील यांनी यावेळी दिली.

हे देखील वाचा :

“त्या” अवैध दारू विक्रेता, सावकारापुढे पोलीस यंत्रणा हतबल ठरतेय का?

वनपरिक्षेत्र अधिकारी आणि लिपिकावर निलंबनाची टांगती तलवार!; वनकर्मचाऱ्यांनी दस्ताऐवजासह केली लेखी तक्रार

१९ वर्षीय तरुणाने दुचाकीसह तलावात उडी घेऊन केली आत्महत्या!

 

 

 

 

Comments are closed.