Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

बिबी येथील जवान किशोर दत्तात्रेय काळुसे यांना वीरमरण

बीबी येथील जवान किशोर काळूसे यांना हृदयविकाराचा झटका आल्याने आले वीरमरण,

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

अहमदनगर दि.०५ ऑगस्ट : अहमदनगर येथील मिलिट्री कॅम्प मध्ये कर्तव्य बजावत असताना बुलढाणा जिल्ह्यातील बीबी येथील जवान जवान किशोर काळूसे यांना हृदयविकाराचा झटका आल्याने ४ ऑगस्ट रोजी  दुपारी दोन वाजता वीरमरण आले. 

मृत्युसमयी त्यांचे वय ३२ वर्ष होते. जवान किशोर काळूसे हे वयाच्या १९ व्या वर्षी २००९ मध्ये सैन्यात भरती झाले होते. त्यांनी सिलिगुडी व पंजाब मधील जालंदर येथे देश सेवा केली त्यानंतर २०१९ मध्ये महाराष्ट्रातील अहमदनगर येथील मिलिट्री कॅम्प मध्ये त्यांची बदली झाली.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

दिनांक ०४ ऑगस्ट रोजी आपले कर्तव्य बजावत असताना त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला व उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. जवान किशोर काळुसे हे नायब सुभेदार पदावर होते. त्यांच्या पश्चात पत्नी, आई, एक भाऊ व एक बहीण असा आप्तपरिवार आहे. जवान किशोर काळुसे यांच्या मृत्यूची बातमी कळताच त्यांच्या कुटुंबीयांवर, मित्र परिवारावर तसेच संपूर्ण बीबी गावावर शोककळा पसरली आहे.

आज ०५ ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजता त्यांच्यावर मूळ गाव असलेल्या बिबी येथे अंत्यसंस्कार केले जाणार असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचां,

भारताचा ऑलिंपिक मधील हॉकीतील तब्बल ४१ वर्षानंतर पदकाचा दुष्काळ संपला,जर्मनीला नमवून कांस्य पदकांवर कब्जा

‘ड ‘ वर्गातील घरकुल लाभार्थ्यांसाठी असलेल्या जाचक अटी शिथिल करा-खा. अशोक नेते यांची लोकसभेत मागणी

तलासरिमध्ये ‘माझा दाखला माझी ओळख’, विद्यार्थ्यांना जातीचे दाखले देण्याचा पथदर्शी उपक्रम

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.