Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

भारताचा ऑलिंपिक मधील हॉकीतील तब्बल ४१ वर्षानंतर पदकाचा दुष्काळ संपला,जर्मनीला नमवून कांस्य पदकांवर कब्जा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

वृत्तसंस्था ५ ऑगस्ट : भारताचा ऑलिंपिक मधील हॉकी खेळातील तब्बल ४१ वर्षानंतर पदकाचा दुष्काळ संपला असून टोकियो ऑलिंपिक २०२० मध्ये गुरुवारी भारत विरुद्ध जर्मनी पुरुष हॉकी संघात कांस्य पदकाचा सामना पार पडला.भारताने ५-४ ने जर्मनीचा पराभव करत कांस्य पदकावर नाव कोरले आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

पहिल्या क्वार्टर मध्ये ०-१ ने मागे असलेल्या भारतीय संघाने दुसऱ्या आणि तिसऱ्या क्वार्टर मध्ये जबरदस्त खेळ दाखवत कांस्य पदकाचा सामना जिंकला  आहे. यासह तब्बल ४१ वर्षांनंतर भारतीय हॉकी संघाने ऑलिंपिक मध्ये पदक जिंकून  इतिहास रचला आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

भारताने १९८० साली मॉस्को ऑलिंपिकमध्ये शेवटचे सुवर्णपदक जिंकले होते. तर १९७२ मध्ये म्यूनिख ऑलिंपिमध्ये शेवटचे कांस्य पदक पटकावले होते.

या सामन्याच्या सुरुवातीलाच पहिल्या क्वार्टरमध्ये जर्मनीने १-० ची आघाडी घेत भारताला पहिला झटका दिला. रियो ऑलिंपिक कांस्य पदक विजेत्या जर्मनी संघाकडून सामन्याच्या दुसऱ्याच मिनिटाला तिमूर ओरूजने मैदानी गोल करत ही आघाडी घेतली होती. त्यानंतर पहिल्या क्वार्टरच्या शेवटच्या १० सेकंदात जर्मनीने ५ पेनल्टी कॉर्नर मिळवले. परंतु भारतीय हॉकी संघाची मजबूत भिंत, गोलकीपर श्रीजेशने शानदार बचाव केला. पुढे दुसऱ्या क्वार्टरच्या दुसऱ्या मिनिटाला सिमरनजीत सिंगने जबरदस्त टॉमहॉक शॉटने गोल करत जर्मनीशी १-१ ने बरोबरी साधली. पण पुन्हा जर्मनीने सामना आपल्या बाजूने वळवला.

जर्मनीकडून २४ व्या मिनिटाला निकलस वेलेन आणि २५ व्या मिनिटाला २ मैदानी गोल ३-१ ची आघाडी घेतली. परंतु भारतीय पुरुष हॉकीपटूंनी २ पेनल्टी कॉर्नरला गोलमध्ये बदलत पहिल्या हाफअखेर सामना ३-३ ने बरोबरीत आणला.  
तिसऱ्या क्वार्टरमध्ये भारतीय संघाचा दबदबा पाहायला मिळाला.

तिसऱ्या क्वार्टरच्या पहिल्याच मिनिटाला पेनल्टी स्ट्रोकवर रुपिंदरपाल सिंगने गोल करत संघाला ४-३ ने आघाडी मिळवून दिली. हा त्याचा टोकियो ऑलिंपिक २०२० मधील चौथा गोल होता. पुढे हीच लय कायम राखत ३४ व्या मिनिटाला सिमरनजीत सिंगने अजून एक गोल करत संघाला ५-३ ची आघाडी मिळवून दिली. तिसऱ्या क्वार्टरच्या शेवटी उभय संघांना प्रत्येकी ३ पेनल्टी क्वार्टर मिळाले. पण दोन्ही संघांना त्याचा फायदा घेता आला नाही.

चौथ्या क्वार्टरच्या सुरुवातीलाच जर्मनीच्या ल्यूकास वेन्डफेडररने (सामन्याचा ४८ वा मिनिट) पेनल्टी कॉर्नरवर गोल करत संघाला विजयाच्या जवळ पोहोचवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यानंतर गोलकीपर श्रीजेशने शानदार बचाव करत जर्मनीला अखेरपर्यंत गोल करू दिला नाही आणि सामन्यासह कांस्य पदकावर कब्जा केला .

हे देखील वाचा,

‘ड ‘ वर्गातील घरकुल लाभार्थ्यांसाठी असलेल्या जाचक अटी शिथिल करा-खा. अशोक नेते यांची लोकसभेत मागणी

 

युवा स्वाभिमान पार्टीच्या वतीने संत गाडगेबाबा यांच्या समाधी समोर कचऱ्याचे होम हवन, पूजन करून केले आंदोलन

Comments are closed.