Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

चंद्रपूर शहरात प्रदूषणाची स्थिती गंभीर; ७५ टक्के आजार प्रदूषणाने

चंद्रपुरात पर्यावरण हानीचा आरोग्यावर परिणाम अभ्यासण्यासाठी करण्यात आले नमुना सर्वेक्षण..

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

चंद्रपूर, दि. २३ डिसेंबर : चंद्रपुर शहरात पर्यावरण हानीचा आरोग्यावर परिणाम अभ्यासण्यासाठी एक नमुना सर्वेक्षण करण्यात आले. पर्यावरण रक्षण संघटना आणि वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी एकत्र येत हे प्रश्नावली स्वरूपातील ऑनलाईन सर्वेक्षण केले.

या सर्वेक्षणाचे निकाल धक्कादायक आहेत. कोळसा-ऊर्जा निर्मिती- उद्योगबहुलता असलेल्या देशातील सर्वच शहरात प्रदूषण स्थिती गंभीर अवस्थेत पोचली आहे.  चंद्रपुरात सर्वेक्षणाला प्रतिसाद देणाऱ्या ९४ टक्के लोकांनी वायु प्रदूषण घातक असल्याची माहिती दिली.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

७५ टक्के लोकांनी वैयक्तिक आजाराची कारणे प्रदूषण असल्याचे नमूद केले. ६७ टक्के लोकांनी प्रदूषणामुळे त्वचा विकार असल्याची माहिती भरली. ५८ टक्के लोकांनी आपले श्वसनविकार प्रदूषणामुळे असल्याचे  मान्य केले. डोळ्याच्या आजारांशी संबंधित विकार ५२% लोकांनी मान्य केले.वर्षभरातील किमान १० दिवस पर्यावरणीय आजारामुळे आपण कामावर जाण्यापासून वंचित राहिल्याचे स्पष्ट उत्तरदात्यांनी सांगितले.

चंद्रपुरात सतत गोळ्या खाऊनच जगावे लागते असे मत ४० टक्के लोकांनी मांडले. चंद्रपुरातील ३६ टक्के नागरिक हिवाळ्यात आजारी होतात. घातक प्रदूषण आणि खालावलेले जीवनमान यामुळे चंद्रपुरात मालमत्तांची किंमत देखील मातीमोल होत चालल्याचे ६९ टक्के लोकांचे मत आहे. जिल्ह्यातील पाणीही प्रदूषित झाले असून हे घातक असल्याचे मत ८३ टक्के लोकांनी व्यक्त केले. व्यापक जनजागृती व प्रदूषणावर प्रशासकीय उपाययोजनांसाठी हे सर्वेक्षण केल्याची माहिती सर्वेक्षकांनी दिली.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा : 

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने किल्ला पर्यटनाला दिमाखात प्रारंभ

वाघाने केली गाईची शिकार; हुसकावण्यासाठी गेलेल्या गावकऱ्यांंवर जेव्हा वाघ चवताळतो तेव्हा …

महिला प्रवाशांच्या दागिन्याची चोरी करणाऱ्या सासू-सुनेला अटक; ४ लाख २७ हजार रुपयांचा ऐवज पोलिसांनी केला जप्त

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.