Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

लोकबिरादरी प्रकल्पाचा ४८ वा वर्धापन दिन विविध कार्यक्रमांनी साजरा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 
लोकबिरादरी प्रकल्प हा वरोरा जि.चंद्रपूर येथील महारोग सेवा समितीचा प्रकल्प आहे. हा प्रकल्प सामाजिक कार्यकर्ते बाबा आमटे यांनी २३ डिसेंबर १९७३ रोजी महाराष्ट्रातल्या गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यामधल्या हेमलकसा या गावातील माडिया गोंड या स्थानिक आदिवासी जमातीच्या विकासासाठी चालू केला. या प्रकल्पांतर्गत एक आश्रम शाळा, एक दवाखाना व प्राण्यांसाठीचे अनाथालय चालवले जाते. बाबा आमटे यांचे कनिष्ठ चिरंजीव डॉ. प्रकाश आमटे व त्यांच्या पत्‍नी डॉ. मंदाकिनी आमटे यांनी ४८ वर्षे सर्व अडचणींवर मात करत हा प्रकल्प चालवत आकारात आणला.  आता सर्व जबाबदारी त्यांच्या मुलांनी व सुनांनी – डॉ दिगंत आमटे व डॉ अनघा आमटे आणि अनिकेत आमटे  व समीक्षा आमटे यांनी स्वीकारली आहे.

गडचिरोली, दि. २४ डिसेंबर :   गडचिरोली जिल्ह्याच्या भामरागड तालुक्यातील हेमलकसा येथे थोर समाजसेवक बाबा आमटे यांनी आदिवासींच्या सर्वागीण विकासासाठी २३ डिसेंबर १९७३ रोजी लोकबिरादरी प्रकल्पाची स्थापना केली. या प्रकल्पाला ४८ वर्ष पूर्ण झाली. पद्मश्री डॉ. प्रकाश आमटे, डॉ. मंदाकिनी यांच्या अविरत सेवेलाही ४८ वर्ष पूर्ण झाली. आता आमटे कुटुंबियांची चौथी पीढी या प्रकल्पातून आरोग्य, शिक्षण, शेती या कार्याच्या माध्यमातून आदिवासींना सेवा देत आहेत. या प्रकल्पाच्या माध्यमातून लाखो आदिवासींच्या जीवनाला आधार मिळाला असून प्रकल्पाला ४८ वर्ष पूर्ण  झाली असून या सेवेने आता ४९ व्या वर्षात पदार्पण केले आहे. काल गुरुवारी दि. २३ डिसेंबर २०२१ रोजी ४८ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

विशेष म्हणजे २३ डिसेंबरला लोकबिरादरी प्रकल्पाचा वर्धापन दिन असतो. तर आज २४ डिसेंबरला डॉक्टर प्रकाश आमटे आणि डॉक्टर मंदाकिनी आमटे यांच्या लग्नाचा वाढदिवस आहे. २५ डिसेंबरला डॉक्टर मंदाकिनी आमटे यांचा वाढदिवस आहे. तर २६ डिसेंबरला डॉक्टर प्रकाश आमटे यांचा वाढदिवस आणि कर्मयोगी डॉक्टर बाबा आमटे यांची जयंती आहे. त्यामुळे चार दिवस या प्रकल्पात कार्यक्रमाची रेलचेल राहणार आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

प्रसिद्ध सेवाकेंद्र हेमलकसातील लोकबिरादरी प्रकल्पाचा ४८ वा वर्धापनदिन विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. यावेळी नवीन व्यायमशाळेच्या इमारतीचे व आर्ट रूम चे उद्घाटन आणि वर्धापनदिन विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. तसेच वर्धापन दिनानिमित्त अहेरी रक्तपेढीसाठी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले.

 

सर्वप्रथम एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प भामरागडचे प्रकल्प अधिकारी तथा अप्पर जिल्हाधिकारी शुभम गुप्ता, प्रसिद्ध सायकलिस्ट अमित समर्थ, डॉ. प्रकाश आमटे व डॉ. मंदाकिनी आमटे यांच्या हस्ते स्व. बाबा आमटे व स्व. साधनाताई आमटे यांच्या प्रतिमांना पुष्पहार घालून दिप प्रज्वलन करण्यात आले.

 

यावेळी इंडियन एक्सप्रेस मुंबईच्या मुख्य संपादिका निरुपमा सुब्रमण्यम, नागपूरचे उद्योजक जितेंद्र नाईक, नागपूरचे वरिष्ठ पत्रकार विवेक देशपांडे, पुण्याचे सुमित मोरे, लोकबिरादरी हॉस्पिटलचे संचालक डॉ. दिगंत आमटे , डॉ. अनघा आमटे,  लोकबिरादरी प्रकल्पाचे संचालक अनिकेत आमटे, आश्रमशाळेच्या व्यवस्थापिका समिक्षा आमटे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

 

 

तद्नंतर आर्टरुमचे उद्घाटन करुन ‘समर्पित बिरादरी’ या वर्धापनदिन विशेषांकाचे डिजिटल उद्घाटन डॉ. प्रकाश आमटे व डॉ. मंदाकिनी आमटे यांच्या हस्ते करण्यात आले. शाळेच्या परिसरात नव्याने साकारलेल्या सुसज्ज जिमचे (व्यायामशाळा) उद्घाटन प्रसिद्ध सायकलिस्ट अमित समर्थ व एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प भामरागचे प्रकल्प अधिकारी तथा अप्पर जिल्हाधिकारी शुभम गुप्ता यांच्या हस्ते करण्यात आले.

 

तसेच रक्तदान शिबिर डॉ. दिगंत व अनघा आमटे यांच्या मार्गदर्शनाखाली दिपक सुतार, विनोद बानोत, अरविंद मडावी‌ व दवाखान्यातील इतर कार्यकर्त्यांच्या नेतृत्वात या रक्तदान शिबिरात एकूण ३८ जणानी रक्तदान केले.

२३ ते २६ डिसेंबर २०२१ दरम्यान आश्रम शाळेचे शालेय स्नेहसंमेलन व शैक्षणिक गंमत जत्रेचे आयोजन करण्यात आले आहे. यादरम्यान विविध शालेय उपक्रमांची रेलचेल विद्यार्थ्यांसाठी राहणार आहे. वर्धापनदिन कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच प्रकल्पातील कार्यकर्ते यांनी मोलाचे सहकार्य केले.

हे देखील वाचा : 

वाघाने केली गाईची शिकार; हुसकावण्यासाठी गेलेल्या गावकऱ्यांंवर जेव्हा वाघ चवताळतो तेव्हा …

चंद्रपूर शहरात प्रदूषणाची स्थिती गंभीर; ७५ टक्के आजार प्रदूषणाने

महिला प्रवाशांच्या दागिन्याची चोरी करणाऱ्या सासू-सुनेला अटक; ४ लाख २७ हजार रुपयांचा ऐवज पोलिसांनी केला जप्त

भंगार धातूचा वापर करून चारचाकी वाहन बनवणाऱ्या माणसाला आनंद महिंद्रा देणार बोलेरो भेट

 

 

Comments are closed.