Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

पिंपळाच्या वृक्षाची अवैध कत्तल थांबवून वन विभागाने दिले जिवनदान…

अहेरीचे तहसीलदार ओंकार ओतारी यांच्या सतर्कतेने विशालकाय पिंपळ वृक्षाची तोड करतांना वनाधिकाऱ्यांना माहिती देऊन जीवनदान मिळवून दिल्याने होत आहे सर्वत्र कौतुक...

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

ओमप्रकाश चुनारकर,

अहेरीचे तहसीलदार ओंकार ओतारी हे पेरमिली वनपरिक्षेत्रातील मिरकल-सक्कीनगट्टा रस्त्यांच्या कामाच्या तपासणीसाठी जात असतांना चंद्रागावालगत अवैधरीत्या विशालकाय पिंपळाचे वृक्ष तोडत असल्याचे लक्षात येताच वनाधिकाऱ्यांना माहिती देत त्या पिंपळाच्या वृक्षाला जिवनदान दिले आहे. अहेरी तालुक्यात महसूल विभाग व वनविभाग संयुक्त एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून पर्यावरणाचे रक्षण करीत आहे. त्यामुळे सर्वंत्र कौतुक होत आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

गडचिरोली, दि. २४ डिसेंबर : आलापल्ली-भामरागड मार्गावर असलेल्या पेरमिली वनपरिक्षेत्रात येत असलेल्या चंद्रा गावालगत विशाल पिंपळाच्या वृक्षाचे अवैधरित्या तोड करीत असल्याचे अहेरी चे तहसीलदार ओंकार ओतारी चौकशीदरम्यान जात असतांना त्यांच्या लक्षात येताच पेरमिलीचे वन परिक्षेत्र अधिकारी योगेश शेरेकर यांना माहिती दिली. त्यावेळी वन परिक्षेत्र अधिकारी क्षणाचा विलंब न करता तातडीने वन कर्मचारी पाठवून अवैध होणारी विशाल पिंपळाची वृक्षतोड थांबवून त्या वृक्षास जीवनदान देत आरोपीस ताब्यात घेतले आहे.

नेमके काय आहे प्रकरण;

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

आज सकाळी दौऱ्यावर असलेले अहेरी चे तहसीलदार  ओंकार ओतारी यांना सकाळी ७:१५ वाजता आलापल्ली-भामरागड मार्गावर असलेल्या चंद्रा गावात मुख्य रस्त्याच्या बाजुला असलेले १५० गोलाईचे विशाल पिंपळवृक्ष काही अज्ञात इसम तोडत असल्याचे दिसले. त्यांनी त्वरीत भ्रमणध्वनी द्वारे पिरमीलेचे वनपरिक्षेत्र अधिकारी योगेश शेरेकर यांना सदर वृक्षतोडी बाबत माहिती दिली.

वनपरिक्षेत्र अधिकारी योगेश शेरेकर यांनी त्वरीत क्षेत्रसहाय्यक पिरमीली तिम्मा, नियत वनरक्षक येर्रावार, कुमारी आत्राम, कुमारी गरमडे, वनमजुर गर्गंम यांच्या सह कक्ष क्रमांक ८५  मौजे चंद्रा येथे मोकास्थळावर भेट दिली असता मोक्यावर एक उभे विशालकाय पिंपळवृक्षाचा काही भाग तोडल्याचे दिसले.

 

 

विशालकाय पिंपळाचे वृक्ष तोडण्याचे कारण :    

चंद्रागावालगत विशालकाय पिंपळाचे वृक्ष असून त्या वृक्षावर दरवर्षी मधमाशी मोठ्या प्रमाणात पोळे करीत असते त्यामुळे सदर आरोपीने मध प्राप्त करण्यासाठी सदर पिंपळाच्या वृक्षाला तोडून मध संकलित करणार होते.

पिंपळाच्या वृक्षाला जीवनदान देण्यासाठी काय प्रयत्न झाले : 

सदर विशालकाय पिंपळाच्या वृक्षाची तोड केल्याने त्या वृक्षाला जीवनदान मिळण्यासाठी सदर वृक्षाला ओल्या मातीचा भरावा दिल्याने वृक्षतोड झालेली जागा भरून निघण्यास मदत होत असते. त्यामुळे गावकऱ्यांच्या सहकार्याने पिंपळवृक्षाला जीवनदान दिले आहे.

वृक्ष संवर्धनाची गरज किती महत्वाची आहे हे संबंधित गावकऱ्यांमध्ये वनकर्मचाऱ्यांच्या चमूने जनजागृती केली असून सध्या अहेरी तहसील अंतर्गत महसूल विभाग व वनविभाग एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून पर्यावरणाचे रक्षण करीत असल्याने सर्वंत्र कौतुक होत आहे.

या घटनेची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी योगेश शेरेकर यांनी उपवनसंरक्षक राहुल सिंह टोलीया व उपविभागीय वनाधिकारी नितेश देवगडे यांना देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करीत  भारतीय वन अधिनियम १९२७ अंतर्गत वनगुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास क्षेत्रसहाय्यक तिम्मा करीत आहेत.

हे देखील वाचा : 

भंगार धातूचा वापर करून चारचाकी वाहन बनवणाऱ्या माणसाला आनंद महिंद्रा देणार बोलेरो भेट

वाघाने केली गाईची शिकार; हुसकावण्यासाठी गेलेल्या गावकऱ्यांंवर जेव्हा वाघ चवताळतो तेव्हा …

लोकबिरादरी प्रकल्पाचा ४८ वा वर्धापन दिन विविध कार्यक्रमांनी साजरा

 

 

Comments are closed.