Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

अबब! प्रियसी साठी चोरल्या तब्बल १५ दुचाक्या; दुचाकी चोरून पुरवीत होते प्रियसी चे लाड

पोलिसांच्या तपासात आरोपींनी दिली कबुली.

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

बुलढाणा, दि. १७ फेब्रुवारी :  बुलडाणा जिल्ह्यात पकडलेल्या दुचाकी चोरट्यांनी पोलीस चौकशीत अजबच कबुली दिली आहे. प्रियसीचे लाड पुरवण्यासाठी हे चोरटे दुचाक्या चोरायचे. अशी माहिती उघडकीस आली आहे.

बुलडाणा जिल्ह्यातील शेगावात दुचाकी चोर सक्रिय असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखा यांना मिळाली होती. त्या आधारे शेगाव मध्ये कारवाई करत पोलिसांनी चक्क १५ चोरीच्या दुचाक्या जप्त केल्या असून ४ आरोपींना ताब्यात घेतले आहे. त्यात ही अजब माहिती समोर आली आहे. ३ आरोपी हे कॉलेज स्टुडंट असून आपल्या प्रेयसी चे लाड पुरविण्यासाठी ते चोरी करत असल्याची कबुली आरोपींनी पोलिसांच्या तपासात दिली आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

बुलडाणा स्थानिक गुन्हे शाखा ने शेगाव मध्ये येऊन कारवाई करत १५ दुचाक्या जप्त करून ४ जणांना अटक केली आहे. त्यांची सखोल चौकशी केली असता, त्यांच्या प्रियसी चे लाड पुरविण्यासाठीच दुचाक्या चोरी करीत असल्याची त्यांनी कबुली दिली आहे. त्यामुळे स्थानिक गुन्हे शाखाच्या अधिकाऱ्यांनी डोक्यावर हात मारला असून पालकांनी आपल्या पाल्यांना सांभाळण्याची गरज असल्याचं ही पोलिसांनी सांगितले.

हे देखील वाचा : 

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

१५ लाखाच्या खवा चोरी प्रकरणी पोलीस शिपायासह ४ जणांविरुद्ध गुन्हे दाखल

अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून पळून जाणारा विकृत तरुण गजाआड

सुलेमानी पत्थर च्या लालसेने हैदराबादच्या एका इसमास सहा लाखाने गंडवले

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.