Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

१५ लाखाच्या खवा चोरी प्रकरणी पोलीस शिपायासह ४ जणांविरुद्ध गुन्हे दाखल

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

यवतमाळ, दि. १६ फेब्रुवारी :  यवतमाळ शहरातील एमआयडीसी परिसरातील वात्सल्य डेरी मिल्क प्रोसेसींग युनीटमधून जवळपास १५ लाखाचा कुंदा आणि खवा चोरी गेला होता. ही बाब वात्सल्य डेरी मिल्क प्रोसेसींग युनीटचे मालक अमित पालन यांच्या लक्षात आली होती. यावेळी त्यांनी वात्सल्य डेरी मिल्क प्रोसेसींग युनीटमध्ये काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याला रंगेहात पकडले होते. वर्षभरापासून तो इतर साथीदरांच्या मदतीने हा प्रकार करत असल्याचे समोर आले होते.

या प्रकरणी लोहारा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. या तक्रारीचे गांभीर्य लक्षात घेता मंगळवार, दि. १५ फेब्रुवारीला लोहारा पोलिसांनी नंदु घोडमारे, दिनेश गारघाटे, शिवा शर्मा आणि पोलिस कर्मचारी अमित कदम याच्यावर कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार दिपमाला भेंडे यांच्या मार्गदर्शनात लोहारा पोलिस करीत आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे देखील वाचा : 

राजनगरीत अतिक्रमण हटाव मोहीम; नगर पंचायत ची निवडणूकी नंतर मोठी कार्यवाही

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

फुटपाथ धारकांच्या मोर्चाला पाहून मुख्याधिकारी ‘पळाले’

वनाधारीत शाश्वत विकासासाठी जिल्हा प्रशासन आणि ग्रामसभांमध्ये होणार सामंजस्य करार

 

 

Comments are closed.