Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

राजनगरीत अतिक्रमण हटाव मोहीम; नगर पंचायत ची निवडणूकी नंतर मोठी कार्यवाही

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

अहेरी, दि. १६ फेब्रुवारी : मागील अनेक वर्षांपासून अहेरी राजनगरीतील रेंगाळलेल्या अतिक्रमण हटावाचामुद्दा बहुचर्चित होता, मात्र अतिक्रमण काही हटले नाही. आज बुधवारी नगरपंचायत च्या पथकाने पोलीस बंदोबस्ता मध्ये आजाद चौक ते दानशूर चौक येथील अतिक्रमण हटवीण्यात आल्याने अहेरीच्या रस्त्यांनी आता मोकळा श्वास घेतला आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

राज घराणातील नेते धर्मरावबाबा आत्राम राज्यमंत्री व पालकमंत्री होते. त्या काळापासून या अतिक्रमण विषय सुरूच आहे. तत्कालीन राज्यमंत्री तथा पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव यांनी अतिक्रमनाचे पाऊल उचलले होते आणि निधी उपलब्ध करून टेंडर सुद्धा झाले होते. पण विरोधीपक्ष यांनी या कामाला सुरुवात करू दिली नाही.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

नुकतीच नगर पंचायत निवडणूक पार पडलीअसून अहेरी नगर पंचायत मध्ये अजय कंकडालवार यांच्या नेतृत्वाखाली आविस चे सत्ता राज नगरीत बसले. सत्ता बसल्या नंतर लगेच अहेरी विकास कामाला सुरुवात केली. अहेरीतील आझाद चौक ते दानशूर चौक हा रोड अतिक्रमण हटाव करायला सुरुवात झाली आहे.

अहेरीत अतिक्रमण विषयी नागरिक हैराण झाले होते या कार्यवाही नंतर सर्वत्र हर्ष निर्माण झाला आहे. अतिक्रमण कार्यवाही करिता स्वतः जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार उभे राहून काम करायला लावले. काही काळ वातावरण तणावाचे निर्माण झाले होते पण पोलीस प्रशासनाने वातावरण कमी केले.

सदर कार्यवाही करिता पोलीस निरीक्षक गहाणे साहेब, नगरपंचायतिचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजय साळवे, महावितरण चे कनिष्ठअभियंता शेंडे नवनिर्वाचित,नगराध्यक्षा रोजा करपेत,उपाध्यक्ष शैलेश पटवर्धन, शिवसेना अहेरी विधानसभा प्रभारीकिशोर पोतदार , शिवसेना जिल्हा प्रमुख रियाज शेख, अरुण दुर्वे, आविस शहर अध्यक्ष प्रशांत गोडशेलवार, तसेच सर्व नगरसेवक, भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना पक्षाच्या प्रमुख पदाधिकारी आणि अहेरी नगरातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.

हे देखील वाचा : 

पाच वर्षीय चिमुकलीचा इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये नोंद

वनाधारीत शाश्वत विकासासाठी जिल्हा प्रशासन आणि ग्रामसभांमध्ये होणार सामंजस्य करार

 

Comments are closed.