Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

पाच वर्षीय चिमुकलीचा इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये नोंद

लातूर येथील पी.एस.जी.इंटरनॅशनल स्कुल मधील विद्यार्थिनी.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

लातूर, दि. १६ फेब्रुवारी : विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा आणि त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी PSG INTERNATIONAL SCHOOL कायमच प्रयत्नशील असते. ह्यासाठीच स्कूल मध्ये विविध स्पर्धांचे आयोजन नेहमी वेगवेगळ्या कार्यक्रमाद्वारे करण्यात येत असते.

तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळेत १५० पेक्षा जास्त Montessori Teaching Methodology वर आधारीत Equipment आहेत. याचेच फलित म्हणून दि. १५ फेब्रुवारी २०२२ रोजी पी.एस.जी.इंटरनॅशनल स्कुलमधील UKG ची विद्यार्थिनी कृष्णवी नागुरे हिला बहुभाषिक आणि बहु-प्रतिभावान असल्याबद्दल इंडियन बुक ऑफ रेकॉर्डसाठी मान्यता आणि कौतुक मिळाले. तिने ५५ सेकंदात ६ वेगवेगळ्या भाषांमध्ये स्वतःची ओळख करून दिली. २७ हाताच्या मुद्रा, १० लेग मुद्रा आणि भरतनाट्यमचे ८ ताल सादर केल्याबद्दल तिचे कौतुकही झाले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

तसेच २ मिनिटांत प्रॉप्ससह तारक मेहता का उल्टा चष्माच्या ११ पात्रांचे अनुकरण आणि राग दुर्गा आणि वेगवेगळे अलंकार वापरून गाणे सादर केल्याबद्दल तिचे विशेष कौतुक झाले. वयाच्या अवघ्या ५ व्या वर्षी तिच्या प्रविण्याचे प्रत्येकालाच कौतुक वाटत आहे.
शाळेच्या वतीने कृष्णवी नागुरेचे विशेष अभिनंदन करण्यात आले.

यावेळी पी.एस.जी.इंटरनॅशनल स्कुल चे संस्थापक अध्यक्ष सचिन देशमुख, संचालिका डॉ. प्रणिता कुलकर्णी यांनी कृष्णवी च्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तिच्या या यशाबद्दल कृष्णवीचे पालक तसेच सर्व शिक्षिका गौरी देशमुख, आश्विनी देशमुख, पूजा मंदाडे, अबोली मोरे, पूनम जाधव, सोनिया पाटील व सहकारी उमेश बोराडे वर्षा धानुरे यांचे विशेष आभार मानले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा : 

दहावी व बारावीच्या परीक्षांसाठी शाळा तेथे केंद्र/ उपकेंद्राची सुविधा.

भीषण अपघात! कारची ट्रक्टरला धडक, धडकेत ४ जणांचा जागीच मृत्यू तर ९ जण गंभीर

वनाधारीत शाश्वत विकासासाठी जिल्हा प्रशासन आणि ग्रामसभांमध्ये होणार सामंजस्य करार

 

 

Comments are closed.