Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

अहेरी विधानसभेत राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाला मोठा धक्का : आ. धर्मरावबाबा आत्राम यांचे खंदे समर्थक शैलेश पटवर्धन यांचा आ.वि.स. मध्ये जाहीर प्रवेश..

जि. प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या बेरजेच्या राजकारणाचा विजय.

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

अहेरी, दि. २० फेब्रुवारी : नुकत्याच झालेल्या नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला अपेक्षित यश मिळाले नसताना अहेरी विधानसभा क्षेत्रात राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.

माजी राज्यमंत्री तथा विद्यमान आ. धर्मरावबाबा आत्राम यांचे खंदे समर्थक निष्ठावंत  शैलेश पटवर्धन व ज्योती सड़मेक यांनी माजी आ. दिपक आत्राम व जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन आदिवासी विद्यार्थी संघात जाहीर प्रवेश केला आहे. पटवर्धन यांचा आविसमध्ये प्रवेश राष्ट्रवादी काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जात आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

विशेष म्हणजे शैलेश पटवर्धन हे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडून सलग दोन वेळा अहेरी नगरपंचायत मध्ये नगरसेवक म्हणून निवडून आले असतानाही त्यांना नगरपंचायतीच्या पदाधिकारी निवडीत बाजूला सारण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळे शैलेंश पटवर्धन यांनी आपल्यावर होत असलेल्या अन्यायापायी नाईलाजाने नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष व उपाध्यक्ष च्या निवडणुकीत बंडखोरी करून आविस व शिवसेनेला साथ दिली व उपाध्यक्ष पद पदरात पाडून घेतले.

आदिवासी विद्यार्थी संघाचे विदर्भ नेते माजी आमदार दिपक आत्राम व जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन त्यांनी रविवारी अहेरी येथे आविसमध्ये जाहीर प्रवेश केला. त्यांचा शाल श्रीफळ व पुष्पहार घालून माजी आमदार दीपक आत्राम, जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी त्यांचे आविस मध्ये स्वागत केले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या बेरजेच्या राजकारणाने नुकत्याच झालेल्या नगरपंचायत निवडणुकीत आविसला अहेरी, सिरोंचा येथे नगराध्यक्ष तर भामरागड व एटापल्ली  येथे उपाध्यक्ष पद काबीज केले आहे. आविसचा अहेरी विधानसभा क्षेत्रात मोठा प्रभाव आहे. त्यामुळे येत्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत सोबतच आगामी विधानसभा व लोकसभा निवडणुकीत मोठी भूमिका बजावणार आहे.

भाजपा, कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस या मोठ्या पक्षांना आगामी निवडणुकीत आविसला हलक्यात घेऊन चालणार नाही. नुकत्याच झालेल्या नगरपंचायतीच्या निवडणुकीने दाखवून दिले आहे.

हे देखील वाचा : 

नक्षलवाद्यांना स्फोटक साहित्य पुरवठा करणारे ४ आरोपी पोलिसांच्या ताब्यात तर १ आरोपी फरार

धक्कादायक! युवकाचा गळफास लावलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

पुणे ते महू भीमज्योत मशाल यात्रेचे महू येथे जोरदार स्वागत

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.