Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

आदिवासी बहुल जिवती तालुक्यातील वीज कामाकडे विशेष लक्ष द्या – ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे

कुळसंगीगुडा येथे वीज यंत्रणा उभारणीच्या कामाचे भूमिपूजन.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

चंद्रपूर, दि. २० फेब्रुवारी : जिवती तालुक्यातील कुळसंगी गुडा हे दहा ते पंधरा आदिवासी लोकांची वस्ती असलेले गाव आहे. या गावातील तसेच आदिवासी बहुल जीवती तालुक्यातील बांधवाच्या जीवनात प्रकाश पोहोचविण्यासाठी महावितरणच्या अधिकाऱ्यांनी विशेष लक्ष द्यावे, असे निर्देश ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिले. वीज यंत्रणा उभारणीच्या कामाचे भूमिपूजन करतांना ते बोलत होते.

कुळसंगी गुडा गावातील विद्युतीकरण हे जिल्हा नियोजन समिती (डीपीडीसी ) च्या आदिवासी घटक योजनेमधून (टी एस पी ) अंतर्गत सतरा लाखांचे अंदाजपत्रक मंजूर झाले असून व आदिवासी बांधवांच्या घरात प्रकाश पोहोचविण्याचे काम महावितरणद्वारा सुरु करण्यात आले आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

या कामाच्या भूमिपूजन प्रसंगी ऊर्जा राज्यमंत्री यांनी महावितरण अधिकाऱ्यांना जिवती या आदिवासी बहुल तालुक्याकडे विशेष लक्ष तसेच शेतकरी बांधवाना प्राधान्याने वीज जोडणी देणे, कृषिपंप धारकांच्या आणि सामान्य नागरिकांच्या विजेच्या समस्या सोडविण्याचे काम प्राधान्याने करावीत, असे निर्देश दिले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

या प्रसंगी अधीक्षक अभियंता संध्या चिवंडे कार्यकारी अभियंता संदेश ठवरे, विजय राठोड , अतिरिक्त अभियंतामहेश तेलंग, नितेश ढोकणे व जिवती उप विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

हे देखील वाचा : 

पुणे ते महू भीमज्योत मशाल यात्रेचे महू येथे जोरदार स्वागत

सिंदेवाही येथे गोसीखुर्दचा उपविभाग सुरू करणार – पालकमंत्री विजय वड़ेट्टीवार

नक्षलवाद्यांना स्फोटक साहित्य पुरवठा करणारे ४ आरोपी पोलिसांच्या ताब्यात तर १ आरोपी फरार

 

 

 

Comments are closed.