Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

चाईल्ड लाईन, बाल सरंक्षण कक्षाने अवघ्या २ तासाआधी थांबविला बालविवाह…

जिल्हा महिला व बाल विकास कार्यालय गडचिरोली व जिल्हा बाल संरक्षण कक्ष, चाईल्ड लाईन, पोलीस स्टेशन गडचिरोली यांची कार्यवाही.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

गडचिरोली  दि, २९ डिसेंबर : आज गडचिरोली जिल्ह्यापासून अगदी १० किमी अंतर असलेल्या पोर्ला या ठिकाणी सकाळी ११ वाजता एक बालविवाह होणार आहे. अशी गोपनीय माहिती सकाळी ८ वाजता मिळाली. लगेच जिल्हा बाल संरक्षण टीम गडचिरोली व चाईल्ड लाईन टीम यांनी सदर बालविवाह रोखण्याकरीता पोर्ला गाव गाठले. बालकाची जन्म पुरावा तपासणी करून, बालक १८ वर्षाखालील असल्याची खात्री पटल्यानंतर लगेच लग्न घरी वर पक्ष व वधू पक्ष यांना एकत्र बसवून बालविवाह बाबतचे दुष्परिणाम व कायद्यानुसार होणारी कार्यवाही याबाबत उपस्थित सर्वांना माहिती देण्यात आली. वर पक्ष हे राहणार आसेगाव तालुका भुसावळ जिल्हा जळगाव येथील असून त्यांना विवाह न करता रिकामे हाथ जाण्याची वेळ जिल्हा बाल संरक्षण कक्षाने आणली.

मुलींच्या वडिलांकडून मुलीचे १८ वर्ष होइपर्यंत बालिकेचे विवाह करणार नाही. असे हमी पत्र लिहून घेतले व बालिकेचे समुपदेशन करण्यात आले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

सदर कार्यवाही जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी प्रकाश भांदककर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अविनाश गुरनुले, संरक्षण अधिकारी कवेश्वर लेनगुरे , प्रियंका आसुटकर समाज कार्यकर्ता जयंत जथाडे , क्षेत्र कार्यकर्ता रवींद्र बंडावार व जिल्हा समन्वयक चाईल्ड लाइन दिनेश बोरकुटे टीम मेंबर तृप्ती पाल, वैशाली दुर्गे, सुनीता पिप्पलशेट्टीवार, पोलिस स्टेशन गडचिरोली येथील सहायक पोलिस निरीक्षक पूनम गोरे , तसेच शिक्षणाधिकारी निकम साहेब यांनी बलिकेचे वय निश्चितीकरिता विशेष सहकार्य केले.

सदर विवाह स्थळी जाऊन १७ वर्ष ४ महिने वय असणाऱ्या बालिकेचा बालविवाह थांबवण्यात जिल्हा बाल सरक्षण टीम, पोलीस विभाग, चाईल्ड लाईन गडचिरोली यांना यश आले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

अश्याप्रकारे जिल्ह्यात कुठेही बालविवाह होत असल्यास जिल्हा बाल संरक्षण कक्ष येथिल अविनाश गुरनुले मो. नो. ९४०३७०४८३४ जिल्हा बाल संरक्षण अधिकारी तसेच चाइल्ड लाईन टोल फ्री क्रं. १०९८ यावर बाल विवाह बाबत संपर्क करावे.

हे देखील वाचा : 

 

विवाहित महिलेची निर्घृण हत्या!

“त्या” तीन शाळकरी मुलांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू

मृत महिलेला टोचली चक्क कोरोनाची लस; आरोग्य खात्यातील सावळा गोंधळ

Comments are closed.