Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

विवाहित महिलेची निर्घृण हत्या!

भुसावळ पोलिस चौकी मागील जंगलात आढळला मृतदेह .

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

भुसावळ, दि. २९ डिसेंबर : भुसावळ शहरालगत आरपीडी रस्त्यावरील सात नंबर पोलिस चौकीमागील जंगल परिसरात महिलेचा मृतदेह आढळून आला आहे. मयत महिलेचे नाव सुचिता शुभम बारसे (३२) रा. कवाडे नगर, भुसावळ येथील असल्याचे स्पष्ट झाले आहे. मयत महिलेच्या छातीवर चाकूने अनेक वार केले असून तिचा गळा आवळून हत्या केल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे.

भुसावळ शहरात सदैव वर्दळ असते आणि या वर्दळीच्या आरपीडी रस्त्यावर पोलिस चौकी क्रमांक सात आहे. या चौकीच्या मागे असलेल्या निर्जन जागी ही घटना बुधवारी मध्यरात्री घडल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

पहाटेच्या सुमारास एका महिलेचा रक्ताच्या थारोळ्यातील मृतदेह पडून असल्याची माहिती शहर पोलिसांना कळवल्यानंतर पोलिस यंत्रणेने घटनास्थळी धाव घेतली. महिलेची हत्या झाल्याची माहिती कळताच पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, शहरचे निरीक्षक प्रताप इंगळे, बाजारपेठचे निरीक्षक दिलीप भागवत, शहरचे सहा.निरीक्षक

महिलेचा खून झाल्याची माहिती कळताच पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, शहरचे निरीक्षक प्रताप इंगळे, बाजारपेठचे निरीक्षक दिलीप भागवत, शहरचे सहा.निरीक्षक संदीप दुनगहू, सहा.निरीक्षक विनोदकुमार गोसावी, बाजारपेठचे सहा. निरीक्षक गणेश धुमाळ यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

भुसावळ ट्रामा केअर सेंटरचे वैद्यकीय अधिकारी डॉ. मयुर चौधरी यांनाही घटनास्थळी बोलावण्यात आले. महिला घटनास्थळापासून काही अंतरावर असलेल्या परिसरातील रहिवासी असल्याची माहिती असून या परिसरातील नागरिकांना सहज तिची ओळख पडल्याचेही समोर आले आहे. याप्रकरणी पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू आहे.

शहरात खुनांचे सत्र थांबायला तयार नाही. मद्यपी पतीचा महिलेने खून केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर पुन्हा शहरातील ३२ वर्षीय विवाहितेचा निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना आज पहाटे उघडकीस आल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे.

हे देखील वाचा : 

“त्या” तीन शाळकरी मुलांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू

मृत महिलेला टोचली चक्क कोरोनाची लस; आरोग्य खात्यातील सावळा गोंधळ

मुंबई उच्च न्यायालयाच्या आस्थापनेवरील लिपिक पदांच्या एकूण २४७ जागांंसाठी भरती

 

Comments are closed.