Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

मृत महिलेला टोचली चक्क कोरोनाची लस; आरोग्य खात्यातील सावळा गोंधळ

सिल्लोड तालुक्यातील उंडणगाव येथील प्रकार.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

औरंगाबाद, दि. २८ डिसेंबर : कोरोनाने मृत्यू झालेल्या महिलेवर आरोग्य यंत्रणेनेच अंत्यसंस्कार केले आणि त्यानंतर चक्क सात महिन्यांनी १८ डिसेंबर रोजी तिला कोविडचा पहिला डोस दिल्याचा संदेश पाठवल्याने आरोग्य खात्यामधला सावळागोंधळ पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला आहे.

सिल्लोड तालुक्यातील उंडणगाव येथील प्राथमिक रोग्य केंद्रात पार्वताबाई अहेलाजी पाटील(७८) यांनी १८ डिसेंबर २०२१ रोजी १ वाजून ५ मिनिटांनी कोविड लसीकरनाचा पहिला डोस घेतल्याची नोंद झाली आहे. याबाबत त्यांच्या मुलगा सुयभान पाटील यांच्या मोबाईल वर पर्वताबाई यांनी कोवीशिल्ड लस घेतल्याचा संदेश आला. त्यानंतर त्याचे लसीकरण झाले असल्याचे प्रमाणपत्र सुद्धा आरोग्य विभागाकडून जारी करण्यात आले आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

पर्वताबाई या २१ एप्रिल २०२१ रोजी आजारी पडल्याने त्यांना औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची कोरोना चाचणी तपासणी केली असता ती कोरोना पॉझिटिव्ह आल्याने त्यांच्यावर घाटी रुग्णालयातच उपचार सुरु होते. यादरम्यान त्यांचे २ मे रोजी त्यांचे निधन झाले. त्याच्यावर आरोग्य यंत्रनेच्या वतीने अंतिम संस्कार ही करण्यात आले होते.

पार्वताबाईच्या मृत्यूची घाटी रुग्णालयासह सिडको पोलीस ठाण्यात नोंद असून, सिडको एन-८ भागातील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाल्याची नोंद आहे.  मात्र असे असतानाही आरोग्य खात्याकडून मृत व्यक्ती च्या नावे लसीकरण करण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

अशी चूक शक्यच नाही

या प्रकारची चौकशी करू; पण असे होणे अशक्य आहे. याबाबत वरिष्ठांना माहिती देऊन तातडीने चौकशी करण्यात येईल.

डॉ. अर्चना सपकाळ – वैद्यकीय अधिकारी, प्रा. आ. केंद्र. उंडणगाव

हे देखील वाचा : 

पतंग पकडण्याच्या नादात चिमुकल्याने गमावला जीव

राज्यपालांनी राजकारण करु नये, संविधानिक पदाचा मान राखावा ! : नाना पटोले

मुंबई उच्च न्यायालयाच्या आस्थापनेवरील लिपिक पदांच्या एकूण २४७ जागांंसाठी भरती

 

 

Comments are closed.