Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

“त्या” तीन शाळकरी मुलांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

नाशिक, दि. २८ डिसेंबर : नाशिक जिल्ह्यातील मखमलाबाद जवळ असलेल्या पाटाच्या पाण्यात बुडून तीन शाळकरी मुलांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या तिन्ही मुलांच्या मृत्यूमुळे गावात शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार नाशिकच्या मखमलाबाद पेठ लिंक रोडवरील तुळजाभवानी नगर येथे ही घटना घडली आहे. निलेश मुळे (१४), प्रमोद जाधव (१३), सिद्धू धोत्रे (१३) अस या मयत झालेल्या मुलांची नावे आहे. हे सर्व गजवक्र नगर भागात असलेल्या नामको कॅन्सर हॉस्पिटल मागे राहत होते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे तिन्ही मित्र आज दुपारी २ वाजताच्या सुमारास आपल्या शाळेतील इतर ५  मित्रांसह पाटावर पोहण्यासाठी गेले होते. पाण्यात उतरल्यानंतर सर्वजण आनंद लुटत होते. पण पाण्यात पुढे गेल्यावर त्यांना  पाण्याचा प्रवाह आणि खोलीचा अंदाज आला नाही. त्यामुळे या पाच जणांमधील  तिघे जण पाण्यात बुडू लागले.

आपले मित्र पाण्यात बुडूत असल्याचे पाहून दोघांना आरडाओरडा केला. पाण्यातून बाहेर निघून तेथील आजूबाजूच्या लोकांना सांगून मदतीसाठी याचना केली. पण, परिस्थितीमुळे घाबरलेल्या या दोन मुलांनी या ठिकाणाहून पळ काढला. नंतर स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली असता तिघे जण पाण्यात बुडाल्याचे आढळले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

स्थानिकांनी तातडीने याची माहिती अग्निशमन दलाला आणि पोलिसांना दिली. पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर अवघ्या अर्धा तासात तिघांना पाण्याबाहेर काढले आणि उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवले. मात्र दुर्दैवाने या तिघाही मुलांचा उपचार सुरू होण्यापूर्वीच मृत्यू झाल्याची माहिती रुग्णालय प्रशासना कडून देण्यात आली.

निलेश मुळे, प्रमोद जाधव, सिद्धू धोत्रे या तिन्ही लहान मुलांच्या मृत्यूमुळे कुटुंबीयांनी रुग्णालयाच्या आवारात एकच आक्रोश केला. पालकांचा आक्रोश पाहून उपस्थितीत लोकांच्या डोळ्यातून पाणी आले. या घटनेमुळे गावात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

या घटनेचा अधिक तपास पंचवटी पोलीस करत आहे.

हे देखील वाचा : 

मृत महिलेला टोचली चक्क कोरोनाची लस; आरोग्य खात्यातील सावळा गोंधळ

सुरजागड लोह खदान रद्द करुन पेसा कायद्यांतर्गत मिळालेले हक्क अबाधित राखण्यात यावेत – आमदार भाई जयंत पाटील यांची विधानपरिषदेत मागणी

पतंग पकडण्याच्या नादात चिमुकल्याने गमावला जीव

 

 

Comments are closed.