Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

इंदू मिलमधील डॉ. आंबेडकरांच्या 350 फुट पुतळ्याची प्रतिकृतीची तयार, धनंजय मुंडेंनी केली पाहणी

मुख्य पुतळ्याचे काम सुरू करण्यासाठी प्रतिकृती अंतिम होणे आवश्यक - धनंजय मुंडे

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

गाझियाबाद दि. १९ मे : मुंबईतील इंदूमिल येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय स्मारक स्थळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य ३५० फुटचा पुतळा बसवण्यात येणार असून या पुतळ्याची प्रतिकृती उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथील प्रसिद्ध आर्टिस्ट पद्मभूषण राम सुतार यांच्या फाईन आर्टस् या ठिकाणी सुरू आहे. या ठिकाणी पुतळ्याची २५ फुटी प्रतिकृती तयार करण्यात आली असून सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षाताई गायकवाड, सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे, यांसह राज्य शासनाच्या समितीने गाझियाबाद येथे भेट देऊन या कामाची आज पाहणी केली.

मुंबईतील इंदूमिल येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य अंतरराष्ट्रीय स्मारक उभारण्यात येत असून, याचे काम जरी एम एम एम आर डी ए कडे असले, तरी त्याच्या सनियंत्रणाची जबाबदारी सामाजिक न्याय विभागाने घेतलेली आहे. राज्य सरकारने सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वात यासाठी मंत्रिमंडळ उपसमिती नेमली असून, या समितीमध्ये नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, शालेय शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड यांचाही समावेश आहे. स्मारक स्थळी उभारण्यात येणार असलेला पुतळा अंतिम करण्याची जबाबदारी देखील या समितीकडे असल्याने आज गाझियाबाद येथे या समितीने भेट देऊन पुतळ्याच्या प्रतिकृतीची पाहणी केली.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

सदर २५ फुटी प्रतिकृती तयार करताना एम एम आर डी ए ने काही बदल त्यामध्ये पूर्वी सुचवले होते. ते बदल करून राम सुतार यांनी २५ फुटी प्रतिकृती साकारली आहे. पद्मभूषण राम सुतार यांनी सरदार वल्लभ भाई पटेल यांच्या स्मारकासह अनेक पुतळ्याचे काम यापूर्वी केलेले आहे.

सदर प्रतिकृतीची पाहणी करताना धनंजय मुंडे यांसह समितीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शरीर यष्टीप्रमाणे पाय, पोट, डोके आदी रचना हुबेहूब असाव्यात याबाबत आणखी काही बदल आज सुचवले आहेत. हे बदल पूर्ण करून त्यास एम एम एम आर डी ए व राज्य शासनाच्या समितीची मान्यता घेतल्यानंतर मुख्य पुतळ्याचे काम हाती घेता येणार असल्याचे धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

सुमारे ११०० कोटी रुपये खर्चून इंदूमिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्मारकाचे काम करण्यात येत असून, इंदूमिल येथे ज्या १०० फुटी पिलर वर मुख्य पुतळा वसवण्यात येणार आहे, त्या पिलरचे ७५% काम पूर्ण झाले असून, लवकरच ते काम पूर्ण केले जाणार आहे. पुतळ्याच्या प्रतिकृतीची पाहणी केली असून, त्यात काही बदल सुचवले आहेत, ते पूर्ण झाल्यानंतर मुख्य पुतळ्याच्या निर्मितीचे काम हाती घेण्यात येईल. निधी उपलब्ध होण्याबाबत कोणतीही अडचण नसल्याने हे काम वेळेत पूर्ण होईल, असे यावेळी धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.

दरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदूमिल येथे बसवण्यात येणाऱ्या मुख्य पुतळ्याची निर्मिती ही प्रतिकृती अंतिम झाल्यानंतरच सुरू करण्यात येईल, यासाठी प्रतिकृतीचे काम वेळेत पूर्ण केले जावे, अशा सूचना यावेळी मंत्रिमंडळ समितीने शिल्पकार राम सुतार व त्यांच्या टीमला दिल्या आहेत.

यावेळी मुंडे यांच्या सह शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड, सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे, समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे, सर जे जे चे अधिष्ठाता प्रा. विश्वनाथ साबळे, इतिहास तज्ञ रुबी मलेपीन, एम एम आर डी ए चे मुख्य अभियंता प्रकाश भांगरे, पद्मभूषण राम सुतार, अनिल राम सुतार, सामाजिक न्याय विभागाचे उपसचिव दिनेश डिंगळे, शापुरजी पालंजी कंपनीचे प्रकल्प व्यवस्थापक उमेश साळुंखे, प्रकल्प सल्लागार अतुल कवटीकवार, विनय बेडेकर, प्रशांत गेडाम आदी उपस्थित होते.

स्मारकाच्या कामास वेग

दरम्यान राज्य शासनाने धनंजय मुंडे, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, शिक्षण मंत्री प्रा. वर्षाताई गायकवाड यांच्या नेतृत्वात इंदूमिल स्मारकाच्या सनियंत्रण साठी एक उपसमिती नेमली आहे. या समितीच्या माध्यमातून धनंजय मुंडे यांच्या सह अन्य सदस्यांनी नुकतीच इंदूमिल येथील स्मारक स्थळी भेट देऊन सुरू असलेल्या कामाची पाहणी केली होती. त्यानंतर आज गाझियाबाद येथे येऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या प्रतिकृतीची पाहणी केली आहे. स्मारकाच्या एकूणच कामाला आता वेग आल्याचे दिसून येत आहे.

हे देखील वाचा : 

भारतीय क्रिकेटपटू नवज्योत सिंग सिद्धूला एक वर्षाचा कारावास; 1987 च्या रोड रेज प्रकरणी सर्वोच्य न्यायालयाने सुनावली शिक्षा

यांत्रिकीकरणाऐवजी मानवीकरणावर भर दिल्यास उत्तम निवडणूक व्यवस्थापन शक्य : प्रो. रजनीश कुमार शुक्ल

जंगली हत्तीकडून पिकाचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना लवकरच मिळेल मोबदला : वनक्षेत्रपाल अरूप कन्नमवार

 

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.