Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

यांत्रिकीकरणाऐवजी मानवीकरणावर भर दिल्यास उत्तम निवडणूक व्यवस्थापन शक्य : प्रो. रजनीश कुमार शुक्ल

वर्धा येथील हिंदी विश्वविद्यालयात 'निवडणूक व्यवस्थापनात माध्यम संशोधनाची भूमिका' या विषयावर राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन आज करण्यात आले.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

वर्धा, दि. १९ मे : यांत्रिकीकरणाऐवजी मानवीकरणावर भर दिल्यास उत्‍तम निवडणूक व्यवस्थापन शक्‍य आहे. असे प्रतिपादन महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाचे कुलगुरू प्रो. रजनीश कुमार शुक्ल यांनी केले. ते १८  मे रोजी प्रादेशिक केंद्र प्रयागराजतर्फे निवडणूक व्यवस्थापनात माध्यम संशोधनाची भूमिका या विषयावर आयोजित एक दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे अध्यक्ष म्‍हणुन बोलत होते.

ते म्‍हणाले की माध्यम संशोधन केवळ डेटा विश्लेषणाने समजू शकत नाही किंवा केवळ तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्तेवर अवलंबून राहून अचूक डेटा मिळवता येत नाही. त्यात विश्वसनीय डेटा आहे की नाही, डेटा संशोधकाने गोळा केला आहे की अन्य कोणाकडून हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. मानवी दृष्टिकोनातून निवडणूक व्यवस्थापन समजून घेणे महत्त्वाचे आहे. निवडणुकीचे निकाल आपल्या बाजूने आणण्यासाठी राजकीय पक्ष निवडणूक व्यवस्थापन करतात. उपलब्ध डेटाच्या विश्वासार्हतेनुसार निवडणूक निकाल निश्चित केले जातात असे ही ते म्हणाले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

वक्ते म्हणून राजकीय विश्लेषक आणि स्तंभलेखक हर्षवर्धन त्रिपाठी म्हणाले की नवीन माध्यमांनी सर्वसामान्यांना जोडले आहे. सोशल मीडियाच्या युगात राजकारण, धर्म आणि जातच नव्हे तर सर्वसामान्यांचे प्रश्नही निवडणुकीचे निकाल ठरवत आहेत. सांप्रदायिक चौकटीत भारताच्या सांस्कृतिक वारशाचा मागोवा घेतल्याने चुकीचा डेटा मिळतो. निवडणूक विश्लेषकांनी निवडणुकीच्या काळात देशाचा सांस्कृतिक वारसा समजून घेणे आणि त्याचे विश्लेषण करणे आवश्यक आहे असेही ते म्‍हणाले.
प्रमुख वक्ते भारतीय जनसंचार संस्था, नवी दिल्लीचे महासंचालक प्रो. संजय द्विवेदी म्हणाले की, माध्यम कर्मचाऱ्यांनी जबाबदार आणि कर्तव्यदक्ष असले पाहिजे. संपादकांच्या विचारांच्या आधारे जनमत तयार करण्याची प्रक्रिया आता बंद झाली आहे. आज सर्वसामान्य माणूस आपल्या अनुभवलेल्या वास्तवाच्या जोरावर निवडणुकीचे निर्णय घेत आहे.

आज माध्यमांच्या निवडक दृष्टिकोनाने वस्तुस्थिती चुकीची ठरवली आहे. संशोधनाच्या दृष्टीकोनातून सार्वजनिक भान केंद्रस्थानी ठेवून बोलण्याची गरज आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

निवडणूक व्यवस्थापनात माध्यम संशोधनाबाबत सर्वसामान्यांच्या भावना ओळखणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.
प्रादेशिक केंद्र प्रयागराजचे अकादमिक निदेश‍क प्रो. अखिलेश कुमार दुबे यांनी पाहुण्यांचे स्वागत व परिचय करून दिला. कार्यक्रमाचे संचालन डॉ.अख्तर आलम यांनी केले तर आभार डॉ.शिखा शुक्ला यांनी मानले. या चर्चासत्रात प्रत्यक्ष व आभासी माध्यमातून शिक्षक, संशोधक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हे देखील वाचा : 

भारतीय क्रिकेटपटू नवज्योत सिंग सिद्धूला एक वर्षाचा कारावास; 1987 च्या रोड रेज प्रकरणी सर्वोच्य न्यायालयाने सुनावली शिक्षा

माजी जि.प. सदस्या विजयाताई विठ्ठलानी यांचा शिवसेनेत प्रवेश 

 

Comments are closed.