Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

माजी जि.प. सदस्या विजयाताई विठ्ठलानी यांचा शिवसेनेत प्रवेश 

महाराष्ट्र राज्याचे नगरविकास मंत्री व गडचिरोली जिल्ह्यांचे पालकमंत्री ना. एकनाथराव शिंदे यांच्याहस्ते शिवसेनेत जाहीर प्रवेश.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

अहेरी, दि. १९ मे : गडचिरोली जिल्ह्यातील माजी जिल्हा परिषद सदस्य, विजयाताई विठ्ठलानी यांनी शिवसेना पक्षप्रमुख,उद्धव ठाकरे यांच्या कार्यशैलीवर विश्वास ठेवून शिवसेनेचा भगवा झेंडा हाती घेतला.

अहेरी विधानसभा क्षेत्रातील आलापल्ली येथील माजी जिल्हा परिषद सदस्या विजया विठ्ठलानी यांनी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे नगरविकास मंत्री व गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेना पक्षात प्रवेश केला असून त्यांच्याकडे पक्षातील महिलाचे संघटन वाढविण्याची जबाबदारी सोपविण्यात येणार आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

बुधवार १८ मे रोजी माजी जिल्हा परिषद सदस्या विजया विठ्ठलानी यांनी पक्ष प्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यावर विश्वास ठेवून शिवसेनेचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश केले.

ठाणे येथील ना. एकनाथ शिंदे साहेब यांच्या निवासस्थानी दस्तुरखुद्द शिवसेनेचे नेते तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथशिंदे यांनी स्वतः विजया विठ्ठलानी यांच्या हातात शिवबंधन बांधून गळ्यात शिवसेनेचा दुपट्टा टाकून हाती भगवा झेंडा दिला. विजया विठ्ठलानी यांच्याकडे पक्ष वाढीसाठी व संघटन मजबुतीसाठी लवकरच अहेरी विधानसभा क्षेत्रातील पक्षाची मोठी जबाबदारी सोपविण्यात येणार आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

गडचिरोली जिल्हातील शिवसेनाचे जिल्हा संपर्कप्रमुख किशोर चंद्रकांत पोतदार तसेच अहेरी विधानसभा क्षेत्राचे शिवसेना जिल्हाप्रमुख रियाज शेख यांच्या मदतीने माजी जिल्हा परिषद सदस्या विजया विठ्ठलानी यांनी शिवसेनेचा भगवा झेंडा व धनुष्यबाण हाती घेतला आहे.

आगामी होऊ घातलेल्या निवडणुकीसाठी विजया विठ्ठलानी यांचे पक्ष प्रवेश शिवसेनेसाठी लाभदायक असल्याचे संकेत असून या आधी जिल्हा परिषदेचे सदस्य आणि मुरब्बी राजकारणी म्हणून विजया विठ्ठलानी यांची ओळख आहे.

पक्ष प्रवेशाच्या वेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रियाज शेख, आरमोरी विधानसभेचे जिल्हा प्रमुख सुरेंद्र सिंग चंदेल तसेच शिवसेना उपजिल्हा प्रमुख धर्मराज रॉयसह शिवसेनेचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.

हे देखील वाचा : 

हनुमान चालीसा अन भोंग्यात अडकलेल्या राजकारण्यांना ही एकात्मता दिसणार का ?

अनाथ, विधवा, दिव्यांग आणि व्हीजे-एनटी साठी अभियान राबवून योजना द्या – राज्यमंत्री बच्चू कडू

विधवा प्रथा बंद व्हावी यासाठी शासन निर्णय जारी; महाराष्ट्राचे पुरोगामी पाऊल

 

Comments are closed.