Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गडचिरोली पोलीस दादालोरा खिडकी व ॲक्सिस बँक यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

गडचिरोली, दि. २९ डिसेंबर : गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम अतिदुर्गम भागातील युवक युवतींना त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी व रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्या संकल्पनेतून अप्पर पोलीस अधीक्षक (प्रशासन) समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) समय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक अहेरी, अनुस तारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस दादालोरा खिडकी व ॲक्सिस बँक यांच्या संयुक्त माध्यमातून गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम अतिदुर्गम भागातील २४ युवक-युवतींना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ॲक्सिस बँक यांच्या संयुक्त विद्यमाने ‘V.L.E.’ Village Lever Enterpreneur आज दिनांक २९ डिसेंबर २०२१ रोजी रोजी एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यशाळेत प्रशिक्षण घेतलेल्या २४ युवक-युवतींचे ‘C.S.C.’ (Common Service Center) करिता रजिस्ट्रेशन करण्यात आले. ‘C.S.C.’ रजिस्ट्रेशन झालेल्या उमेदवारांमुळे बँक सेवा, जात प्रमाणपत्र, पिक विमा, पंतप्रधान विमा योजना, ई-श्रम कार्ड, पेन्शन सर्विस, इन्शुरन्स यासारख्या इतर ३०० सुविधा दुर्गम भागातील नागरिकांना त्यांच्या दारात उपलब्ध करून देण्यात येणार असल्याने त्यांना आता या कामांकरिता पैसा व वेळ खर्च करून दूर अंतरावरील तालुक्याच्या ठिकाणी जाण्याची गरज राहणार नाही.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

सदर कार्यक्रमा प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून अप्पर पोलीस अधीक्षक प्रशासन समीर शेख तर ॲक्सिस बँक गडचिरोली चे शाखा व्यवस्थापक राजेश पवार तसेच ॲक्सिस बँक गडचिरोली चे जिल्हा समन्वयक (V.L.E.) शाहीद शेख यांची उपस्थिती होती.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

गडचिरोली पोलीस दलाच्या पोलीस दादालोरा खिडकीचा माध्यमातून आतापर्यंत बीओआय आरसिटी व कृषी विज्ञान केंद्र, गडचिरोली यांचे सहकार्याने ब्युटी पार्लर – ७०, मत्स्यपालन – ६०,कुक्कुटपालन – २९३, शेळीपालन – ६७, लेडीज टेलर – ३५, फोटोग्राफी – ३५, मधुमक्षिकापालन – ३२, भाजीपाला लागवड – १९०, तसेच टू व्हीलर व फोर व्हीलर ड्रायव्हिंग प्रशिक्षण – १००, पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण – ५००,  फास्ट फूड – ३५ अशा एकूण १४१७ युवक-युवतींना स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण देण्यात आले आहे.

या कार्यशाळेच्या यशस्वितेसाठी जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलिस अधिकारी तसेच नागरिक कृती शाखेचे प्रभारी अधिकारी सपोनी महादेव शेलार व सर्व पोलीस अंमलदार तसेच ॲक्सिस बँक गडचिरोली चे सर्व अधिकारी कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.

हे देखील वाचा  : 

महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा महामंडळात (ESIC) ५९४ जागांसाठी मेगा भरती

विवाहित महिलेची निर्घृण हत्या!

चाईल्ड लाईन, बाल सरंक्षण कक्षाने अवघ्या २ तासाआधी थांबविला बालविवाह…

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.