Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

आलापल्ली येथे महिला व किशोरवयीन मुलींसाठी कार्यशाळेचे आयोजन

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

आलापल्ली, दि. २७ फेब्रुवारी : ग्रामपंचायत आल्लापल्ली व कैवल्य एज्युकेशन फाउंडेशन/पिरॅमल फाउंडेशन याच्या संयुक्त विद्यमाने एक दिवशीय महिला व किशोरवयीन मुलींसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. सदर कार्यशाळा महिला संबंधित कायदे,मासिक पाळी, गृह उदयोगा संबंधित मार्गदर्शन, महिला सक्षमीकरण व सक्षम बिटीया अभियान किशोरवयीन मुली बॅक टू स्कूल या विषयावर सखोल मार्गदर्शन करण्यात आले.

आल्लापल्ली येथील ग्रामपंचायत वीर बाबुराव सभागृह येथे पार पडली. या कार्यशाळेत मार्गदर्शक म्हणूना पोलीस उपनिरीक्षक आसावरी शेळके यांनी महिला विषयक कायदे याविषयी मार्गदर्शन केले, मनीषा कांचनवार यांनी (मासिक पाळी बद्दल महिला तसेच किशोरवयीन मुलींना मार्गदर्शन करण्यात आले, स्वाती जैनवार (वकील) महिला सक्षमीकरण या विषयावर मार्गदर्शन केले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

सोपान कवळे व्यवस्थापन (महिला आर्थिक विकास महामंडळ, अहेरी) सक्षम बिटिया अभियान या विषयावर संगीता रासमवार, सरस्वती धायगुडे यांनी मार्गदर्शन केले. तसेच ग्रामपंचायत सदस्य पुष्पा अलोणे यांनीही मार्गदर्शन केले. त्याचबरोबर कार्यक्रमाची रूपरेषा व प्रस्तावना कैवल्य फाउंडेशन चे प्रोग्राम लीडर राज वळवी यांनी केले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

सदर कार्यशाळेमध्ये राणी दुर्गावती विद्यालय , धर्मराव विद्यालयाच्या विद्यार्थीनी व दोन्ही महाविद्यालयाच्या महिला शिक्षक वर्ग उपस्थित होत्या तसेच कैवल्य वेल्फेअर फाउंडेशन, उमेद महिला बचत गटाच्या महिला उपस्थित होत्या व अंगणवाडी सेविका, ग्रामीण रुग्णालयातील परिचारिका(नर्स) व आशावर्कर वरील सर्व उपस्थित होते.

पिरॅमल फाउंडेशन चे चंदन रापतीवार आणि गांधी फेलो कपिल बांबोळे, सागर ठाकरे, वरुण रुखमंगड यांनी कार्यशाळा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सहकार्य केले.

हे देखील वाचा : 

गडचिरोली वनवृत्तात सेवानिवृत्त अधिकारी आजही कार्यरत!

आलापल्ली वनविभागात सेवानिवृत्त अधिकारी आजही कार्यरत!

आलापल्ली येथील जैवविविधता उद्यान मोजतेय अखेरची घटका

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.