Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

धक्कादायक! अनैतिक संबंधातुन एकाचा खून : एकाला अटक

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  

जळगाव, दि. २६ मार्च : शहरातील समता नगर भागातील तरूणाचा खून हा अनैतिक संबंधाच्या प्रकारातून झाला असून यातील आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.

शहरातील समता नगर भागातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ सागर नरेंद्र पवार या तरूणावर रात्री उशीरा धारदार शस्त्राने हल्ला झाल्याने पहाटे त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

सागर नरेंद्र पवार हा तरूण समता नगरात एकटाच राहत होता. रात्री उशीरा त्याच्यावर एकाने हल्ला केला. यात गंभीर जखमी झालेल्या सागराला पहिल्यांदा जिल्हा रूग्णालय आणि नंतर खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असतांना त्याने शेवटचा श्‍वास घेतला.

दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून अमित खरे (३३) या तरूणाला ताब्यात घेतले आहे. मयत सागरचे अमितच्या पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याने याची कुणकुण अमितला लागल्याने यातूनच त्याने सागरला संपविल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याच्यावर रामानंद पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा : 

“वस्त्रोद्योग क्षेत्रात भारताने आपले गतवैभव पुनश्च प्राप्त करावे” : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी 

महिला डॉक्टरांच्या आत्महत्तेने नांदेड शहरात खळबळ

वेस्टर्न कोल फिल्ड्स लिमिटेडच्या बेधुंद कारभारामुळे शिरना नदी चे पात्रच दुभंगत असल्याने नवे संकट समोर!

 

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.