Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

प्रत्येक आईने आपल्या मुलीला चांगल्या कामासाठी प्रोत्साहित केले पाहिजे – हेमामालिनी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

नागपूर, दि. 26 मार्च :  प्रत्येक क्षेत्रात महिलांची भागीदारी असून मोठ मोठ्या कामात महिलांनी आपले योगदान दिले आहे, तेव्हा प्रत्येक आईने आपल्या मुलीला चांगल्या कामासाठी प्रोत्साहित केले पाहिजे असे प्रतिपादन पद्मश्री, प्रसिद्ध अभिनेत्री आणि खासदार हेमामालिनी यांनी आज नागपूर येथे केले.

महिला उद्योजकतेला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने एम एस एम ई डी आय नागपूर आणि गायत्री महिला औद्योगिक सहकारी संस्था मर्यादित यांच्या संयुक्त विद्यमाने व्हिजन एक्स्पो 2022 उद्योजिका मेळाव्याचे दक्षिण मध्य शेत्र सांस्कृतिक केंद्र नागपूर येथे आयोजन करण्यात आले असून या मेळाव्याचे उद्घाटन पद्मश्री, खासदार आणि अभिनेत्री हेमा मालिनी, नागपूरच्या जिल्हाधिकारी आर. विमला यांच्या हस्ते करण्यात आले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

त्यावेळेला उद्घाटक म्हणून त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नागपूरच्या जिल्हाधिकारी आर. विमला, संस्थेच्या अध्यक्षा कांचन गडकरी, एम एस एम ई चे निदेशक पार्लेवर उपस्थित होते. पुढे त्या म्हणाल्या आईचा आशिर्वाद असेल तर मुली या पुढे जात असतात असेही त्या म्हणाल्या.

यावेळेला हेमामालिनी यांनी नागपूरसह देशात सुरू असलेल्या कामाबद्दल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची स्तुती देखील केली. हेमामालीनी यांच्या हस्ते वीर मातेला सन्मानित देखील करण्यात आले. तसेच उद्योजक महिलांचा सत्कार देखील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. प्रदर्शन चार दिवस असून 11 ते 8.30 पर्यंत खुले राहणार आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

या प्रदर्शनात महिलांनी तयार केलेल्या विविध वस्तूंचे स्टॉल लावण्यात आलेले असून विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन देखील करण्यात आलेले आहे.

हे देखील वाचा : 

धक्कादायक! अनैतिक संबंधातुन एकाचा खून : एकाला अटक

मुस्लिम प्रिन्सिपल महिलेच्या राजीनाम्यानंतर हिजाब प्रकरणाची विरारमध्ये चर्चा

 

Comments are closed.