Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

भीषण अपघात: दोन दुचाकीस्वाराची समोरासमोर धडक, धडकेत दोन्ही दुचाकीस्वार गंभीर जखमी

अमरावती शहरानजीक असलेल्या राज्य राखीव दलाच्या वसाहती समोरील घटना.

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

अमरावती, दि. ८ फेब्रुवारी :  अमरावती शहरानजीक असलेल्या राज्य राखीव दलाच्या वसाहती समोर आज सकाळच्या सुमारास दोन दुचाकीस्वराची समोरासमोर धडक झाल्याने भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये दोघे हि दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले असून दोघांवर हि एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

पोलीस सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी ९ वाजताच्या सुमारास मंगेश गावंडे नामक व्यक्ती आपल्या दुचाकी ने चांदुर रेल्वे वरून आपल्या नातेवाईकांच्या भेटीसाठी रुग्णालयात येत होता. त्याचवेळी त्याच्या समोरून अमरावती कडून चांदुर रेल्वे कडे भरधाव वेगाने दुचाकीस्वार एका स्कुल बसला ओव्हर टेक करीत समोर जात होता. मात्र त्याचे नियंत्रण बिघडल्याने तो सरळ गावंडे यांच्या दुचाकी वर जाऊन आदळला.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हा अपघात एवढा भीषण होता कि दोन्ही दुचाकीचे तुकडे यात झाले. अपघात झाला यावेळी नागरिक या ठिकाणी होते. त्यांनी दोघांनाही उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. यात एकाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

हे देखील वाचा  : 

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

2022 चा उपमहापौर श्री वासिम शेख तर स्वर्गीय लता मंगेशकर महिला उपमहापौर श्री चा किताब पूजा गौडा ला प्रदान

“महाराष्ट्राच्या ‘एकलव्य’ चा जगविख्यात फोर्ब्सच्या यादीत समावेश”

धक्कादायक! केंद्र सरकारच्या तिजोरीवर 100 कोटींचा डल्ला?

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.