Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

राज्य सरकारमध्ये ९०० पदांसाठी मोठी भरती

MPSC Exam ; नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी खुशखबर...राज्य शासनात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची भरतीकरीता पात्रता स्पर्धा परीक्षा घेणाऱ्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने उमेदवारांना खुशखबर दिली आहे

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

मुंबई डेस्क : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने नोकरीच्या शोधात असलेल्यां उमेदवारांना खुशखबर दिली आहे .राज्य  शासनात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची भरतीकरीता पात्रता स्पर्धा परीक्षा घेणाऱ्या. आयोगाने महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२१ साठी  पदांकरीता जाहिरात प्रसिद्ध केली आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने अधिकृत संकेतस्थळावर ‘महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२१’ साठी जाहीर करण्यात आलेल्या पदांमध्ये उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, गृह विभाग, वित्त विभाग, सामान्य प्रशासन विभागातील विविध जागांचा सामावेश आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

पदे आणि पदसंख्या

उद्योग निरिक्षक (गट क) – १०३ पदे ,  दुय्यम निरिक्षक (गट क)- ११४ पदे.
तांत्रिक सहाय्यक (गट क) – १४ पदे ,  कर सहाय्यक  (गट क) – ११७ पदे,
लिपिक-टंकलेखक (मराठी) – ४७३ पदे ,  लिपिक-टंकलेखक (इंग्रजी) – ७९पदे 

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

या सर्व पदांसाठी 100 गुणांची एका तासाची बहुपर्यायी पूर्व परीक्षा होईल. तदनंतर मुख्य परीक्षेसाठी उमेदवारांची निवड करण्यात येईल.

एमपीएससीच्या संकेतस्थळावर 22 डिसेंबर 2021 ते 11 जानेवारी2022 पर्यंत वरील पदांसाठी अर्ज करता येईल.

संयुक्त परीक्षा पूर्व परीक्षा ( गट क ) 2021 परीक्षा 3 एप्रिल 2022  रोजी होणार आहे. उमेदवारांनी अधिक तपशीला साठी https://mpsconline.gov.in/candidate संकेतस्थळावर भेट द्यावी.

हे देखील वाचा ,

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी (NIFT) मध्ये १९० जागांसाठी भरती

गडचिरोली येथील महावितरण कंपनीत प्रशिक्षणार्थी पदांच्या १०९ जागांसाठी भरती

भारतीय कृषी संशोधन संस्थेत ६४१ जागांसाठी भरती

 

उद्यापासून विधानमंडळाचे हिवाळी अधिवेशन; आरटी-पीसीआरसह सर्व उपाययोजनांसंदर्भात उच्चस्तरीय आढावा बैठक

Comments are closed.