Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

शिक्षण विभागाकडून दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

४ मार्च ते ३० मार्च या दरम्यान बारावीच्या परीक्षा होणार आहेत, तर १५ मार्च ते ४ एप्रिल दरम्यान दहावीची परीक्षा पार पडणार आहे.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

मुंबई डेस्क, दि. २१ डिसेंबर : शिक्षण विभागाकडून दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रकर जाहीर करण्यात आले आहे. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्वीट करत यासंदर्भात माहिती दिली आहे. ४ मार्च ते ३० मार्च या दरम्यान बारावीच्या परीक्षा होणार आहेत, तर १५  मार्च ते ४ एप्रिल दरम्यान दहावीची परीक्षा पार पडणार आहे.

गेल्या दोन वर्षांपासून दहावी आणि बारावीच्या परीक्षा झाल्या नव्हत्या विद्यार्थ्यांना मुल्यमापनाच्या आधारे पास करण्यात आले होते. यंदाही ऐन परीक्षेच्या वेळी ओमिक्रॉनचा नवा व्हेरिएंट आल्याने यंदा तरी परीक्षा होणार की नाही? याबाबत विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता, मात्र आता परीक्षांच्या तारखा जाहीर झाल्याने परीक्षांबाबतचा संभ्रम दूर झाला आहे.  विद्यार्थ्यांना आणि पालकांना परीक्षेचं संपूर्ण वेळापत्रक www.mahahsscboard.in या अधिकृत संकेतस्थळावर पहायला मिळेल.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

बारावी परीक्षेचा सविस्तर वेळापत्रक –

४ मार्च – इंग्रजी
५ मार्च – हिंदी
७ मार्च – मराठी, गुजराती, बंगाली, तेलगू ,पंजाबी ,तामिळ
८ मार्च – संस्कृत
१० मार्च – फिजिक्स
१२ मार्च – केमिस्ट्री
१४ मार्च – माथेमॅटिक्स अँड स्टॅटिस्टिक्स
१७ मार्च – बायोलॉजी
१९ मार्च – जियोलॉजी
९ मार्च-  ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंट
११ मार्च – सेक्रेटरीयल प्रॅक्टिस
१२ मार्च – राज्यशास्त्र
१२ मार्च – अकाउंट अँड ऑफिस मॅनेजमेंट पेपर 1
१४ मार्च – अकाउंट अँड ऑफिस मॅनेजमेंट पेपर 2
१९ मार्च – अर्थशास्त्र
२१ मार्च – बुक किपिंग अँड अकाउंटन्सी
२३ मार्च – बँकिंग पेपर – 1
२५ मार्च – बँकिंग पेपर – 2
२६ मार्च – भूगोल
२८ मार्च – इतिहास
३० मार्च – समाजशास्त्र

दहावी बारवी परीक्षेचं सविस्तर वेळापत्रक – 
१५ मार्च : प्रथम भाषा (मराठी, हिंदी उर्दू, गुजराती आणि इतर प्रथम भाषा)
१६ मार्च : द्वितीय वा तृतीय भाषा
१९ मार्च : इंग्रजी
२१ मार्च : हिंदी ( द्वितीय किंवा तृतीय भाषा)
२२ मार्च : संस्कृत, उर्दू ,गुजराती व इतर द्वितीय वा तृतीय विषय  (द्वितीय किंवा तृतीय भाषा)
२४ मार्च : गणित भाग – 1
२६ मार्च : गणित भाग 2
२८ मार्च : विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1
३० मार्च : विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2
१ एप्रिल : सामाजिक शास्त्र पेपर 1
४ एप्रिल :  सामाजिक शास्त्र पेपर 2

हे देखील वाचा : 

मोठी बातमी: २०१८ च्या टीईटी परीक्षेतही मोठा घोळ, ५ कोटींचा आर्थिक व्यवहार; तिघांना अटक

उद्यापासून विधानमंडळाचे हिवाळी अधिवेशन; आरटी-पीसीआरसह सर्व उपाययोजनांसंदर्भात उच्चस्तरीय आढावा बैठक

गडचिरोली येथील महावितरण कंपनीत प्रशिक्षणार्थी पदांच्या १०९ जागांसाठी भरती

 

Comments are closed.