Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

धारदार शस्त्र व कोयत्यांचा नंगा नाच करणाऱ्या तडीपार गुंडांची पोलिसांनी काढली धिंड

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

नाशिक, दि. ७ फेब्रुवारी : नाशिकरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चेहेडी पंपिंग परिसरातल्या संगमेश्वर नगरमध्ये दोन दिवसांपूर्वी अचानक रात्रीच्या वेळेला काही तडीपार सराईतांनी त्या ठिकाणच्या घरांच्या काचा फोडून एका घरात जबरदस्तीने प्रवेश करीत  घरातील वस्तूंची कोयते तलवारीच्या सहाय्याने तोडफोड करीत लाखो रुपयांचे नुकसान केले. तसेच परिसरातील एका रिक्षाची देखील काच या गुंडांनी फोडली होती. त्यानंतर परिसरात या घटनेने लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

खुलेआम परिसरात धारदार शस्त्र व कोयत्यांचा नंगा नाच करणारे हे सराईत तडीपार आहेत. त्यांच्याविरोधात खून तसेच मारामाऱ्या, गावठी कट्टे बाळगणे आर्म्स अॅक्ट सारखे गंभीर गुन्हे दाखल असताना देखील नाशिकरोड पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र घडलेल्या प्रकाराची दखल माध्यमांनी घेतल्यानंतर अखेर या संशयितांच्या विरोधात ४५२, ४/२५ आर्म अॅक्ट चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

या गुन्ह्यात रोशन पोपट सोनवणे व संदीप शिंदे ऊर्फ हुसळ्या यांना अटक करण्यात आली असून काल सायंकाळच्या सुमारास नाशिक रोड परिसरातून त्यांची धिंड काढण्यात आली. तसेच मुख्य आरोपी सागर कोकणे व प्रशांत जाधव हे अद्याप पोलिसांच्या हातावर तुरी देत फरार आहेत. प्रशांत जाधव याच्यावर आधीच खुनाचा गुन्हा दाखल होता. तुरुंगातून सुटल्यानंतर त्यानी मोठी रॅलीदेखील काढली होती.

हे देखील वाचा : 

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

मोठी बातमी : गॅस गिझर लिक झाल्याने महिला पायलटचा मृत्यू

त्यागमूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर यांची १२४ वी जयंती साजरी

तब्बल आठ महिन्यांनी दफन केलेला मृतदेह काढला बाहेर..

 

 

 

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.