Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

नितेश राणे यांना घेऊन वैद्यकीय पथक कोल्हापूरला रवाना

पोलीस बंदोबस्तात १०८ रुग्णवाहिकेने कोल्हापूर येथे रवाना. 

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

सिंधुदुर्ग, दि. ७ फेब्रुवारी : शिवसैनिक संतोष परब यांच्यावरील हल्लाप्रकरणी न्यायालयीन कोठडीतील भाजपचे आमदार नितेश राणे आणि त्यांचा खासगी सचिव राकेश परब यांच्या जामीन अर्जावर मंगळवारी जिल्हा न्यायालयात सुनावणी होणार आहे. दरम्यान आमदार नितेश राणे यांना वैद्यकीय तपासणी आणि उपचारासाठी कोल्हापूरला हलविण्यात आले आहे.

कोल्हापूर येथील शासकीय छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात त्यांना जिल्ह्यातील डॉक्टरांच्या विशेष पथकाच्या देखरेखी नेण्यात येत आहे. पोलीस बंदोबस्तात १०८ रुग्णवाहिकेतून नितेश राणे यांना घेऊन वैद्यकीय पथक कोल्हापूरच्या दिशेने रवाना झाले आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

कणकवली दिवाणी न्यायालयाने आमदार नितेश राणे यांना शुक्रवारी १८ फेब्रुवारी पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर त्यांची तब्येत बिघडली म्हणून त्यांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.

दरम्यान तातडीने नितेश राणे यांच्या वकिलांनी आमदार नितेश राणे आणि त्यांचे खासगी सचिव राकेश परब यांचा जामीन अर्ज जिल्हा सत्र न्यायालयात दाखल केला आहे. या जामीन अर्जावर मंगळवारी सुनावणी होणार आहे. दरम्यान आज आमदार नितेश राणे यांना अधिक वैद्यकीय तपासणीसाठी आणि उपचारासाठी कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयात दाखल केले जात आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा : 

तब्बल आठ महिन्यांनी दफन केलेला मृतदेह काढला बाहेर..

मोठी बातमी : गॅस गिझर लिक झाल्याने महिला पायलटचा मृत्यू

धारदार शस्त्र व कोयत्यांचा नंगा नाच करणाऱ्या तडीपार गुंडांची पोलिसांनी काढली धिंड

 

Comments are closed.