Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

तब्बल आठ महिन्यांनी दफन केलेला मृतदेह काढला बाहेर..

चुकीचे औषध डॉक्टरांनी लिहून दिल्याने त्याच औषधाने नेहा मुलीचा मृत्यू झाल्याचं पालकांचा दावा..

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

ठाणे, दि. ७ फेब्रुवारी :  चुकीचे औषध दिल्यामुळे दीड वर्षाच्या चिमुरडीचा मृत्यू झाल्याचा आरोप करीत तिच्या कारणीभूत ठरलेल्या दोघा डॉक्टरांविरोधात कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी पोलीस ठाण्यात विविध कलमानुसार गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली होती. डॉ. मोहंमद ताज अन्सारी (४५), डॉ. एस. एम. आलम (४५), असे गुन्हा दाखल झालेल्या डॉक्टरांची नावे असून यांची जामिनावर मुक्तता झाली आहे. मात्र,  चिमुरडीचा मृत्यू नेमका कशामुळे झाला यासाठी दोन दिवसांपूर्वी न्यायालयाच्या परवानगीने तब्बल ८  महिन्यांनी तिचा दफन केलेला मृतदेह पोलिसांनी बाहेर काढून मृतदेहाचे नमुने फॉरेन्सिक लॅबमध्ये उत्तर तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.

कल्याण पूर्वेतील गोविंदवाडी परिसरात मुन्नी सहानी ह्या कुटूंबासह राहतात. तर याच भागात गुन्हा दाखल झालेल्या डॉक्टरांचे हसन नावाने क्लिनिक आहे. मुन्नी सहानी यांची लहान मुलगी नेहा आजारी असल्याने ५ जुलै २०२१ रोजी हसन क्लिनिकमध्ये दुपारच्या सुमारास मुलीला घेऊन उपचारासाठी गेल्या होत्या. त्यावेळी तिची तपासणी करून डॉक्टर मोहंमद अन्सारी यांनी डॉ. आलम यांच्या लेटरहेडवर नेहाला औषधें लिहून देत त्या औषधांचे नेहाला सेवन करण्यास तिच्या आईला सांगितले. मात्र, त्या औषधांचे सेवन केल्याने नेहाची प्रकृती अधिक गंभीर झाली होती. त्यामुळे पुन्हा ६जुलै २०२१ रोजी नेहाची आई तिला पुन्हा हसन क्लिनिकमधील डॉक्टराकडे घेऊन गेली. मात्र, त्याच दिवशी सांयकाळच्या सुमारास तिचा मृत्यू झाला होता.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

चुकीच्या औषधांचे सेवन केल्याने नेहाचा मृत्यू झाल्याचा ठपका नेहाच्या आई वडिलांनी डॉक्टर वर ठेवला होता. तत्कालीन पोलीस अधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल केला नसल्याने मुलीचे आईवडीलांनी न्यायालयात धाव घेत संबंधित डॉक्टर वर गुन्हा दाखल करून
आपल्या मुलीचा मृत्यू कशामुळे झाला आहे. याची तपासणी करण्यासाठी मुलीचा मृतदेह बाहेर काढून त्याची तपासणी केली जावी. अशी मागणी केली होती. यावरून न्यायालयाने संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार ९ डिसेंबर, २०२१ रोजी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात दोन्ही डॉक्टरांविरोधात भा.द.वी.चे कलम ३०४, ४०६, ३४ सह महाराष्ट्र वैद्यकीय व्यवसाय अधिनियम १९६१ चे कलम ३३ (२), ३३ (अ) ३६ प्रमाणे गुन्हा दाखल केला होता.

न्यायालयाच्या आदेशाने डिसेंबर महिन्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यावेळी दोघांना अटकही केली. मात्र, काही दिवसांपूर्वीच डॉक्टरसह त्याच्या साथीदाराला न्यायालयाने जमीन मंजूर केला. त्यातच न्यायालयाकडे मुलीचा मृतदेह बाहेर काढून त्याची तपासणी केली जावी, अशी मागणी तिच्या पालकांनी केली होती. कारण मुलीच्या मृत्यूनंतर कल्याणच्या रुक्मिणीबाई रुग्णालयांमध्ये उत्तर तपासणीसाठी घेऊन गेले असता मुलीच्या आई-वडिलांनी विरोध करून उत्तर तपासणी नाकारताच मुलीचा मृतदेह दफन केला होता. मात्र मुलीचा मृत्यू कशाने झाला हे समजण्यासाठी पुन्हा आई-वडिलांनी मृतदेह बाहेर काढून तपासण्यात यावा असा आग्रह धरला.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

त्यांनतर न्यायालयाच्या आदेशानंतर ३ जानेवारी, २०२२ रोजी नायब तहसीलदार सुषमा बांगर यांच्या उपस्थित पोलीस आणि तज्ज्ञ डॉक्टरांनी चिमुरडीचा दफन केलेला मृतदेह बाहेर काढला. आता मृतदेहाच्या सांगाड्याचे सॅम्पल घेऊन मुंबईतील कलिना येथील फॉरेन्सिक लॅबला पाठविला आहेत. फॉरेन्सीक लॅबचा अहवालातून मुलीच्या मृत्यूचे कारण बाहेर येऊ शकते, असे मृत मुलींच्या पालकांनी सांगितले.

हे देखील वाचा : 

बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) च्या वतीने संविधान साक्षरता अभियान कार्यक्रमाचे आयोजन

 

 

 

 

Comments are closed.