Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

मोठी बातमी : गॅस गिझर लिक झाल्याने महिला पायलटचा मृत्यू

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

नाशिक, दि. ७ फेब्रुवारी : नाशिक शहरात राहणाऱ्या महिला वैमानिकाचा बाथरूम मधील असलेल्या गिझरमधून गॅस गळती होऊन  मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेची माहिती होताच परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.  मृतक महिला वैमानिकेचे नाव रश्मी पराग गायधनी असे असून त्या मुंबईत एअर इंडियामध्ये पायलट या पदावर कार्यरत होत्या, त्यांचे मूळ गाव नाशिक आहे.

रश्मी गायधनी ह्या बाथरूममध्ये आंघोळ करत असताना गिझरमधून गॅस गळती होऊन गॅस सगळीकडे पसरल्यामुळे रश्मी या बाथरूममध्येच बेशुद्ध पडल्या, बराच वेळ बाहेर न आल्याने कुटुंबीयांनी बाथरूमचा दरवाजा तोडला असता रश्मी बाथरूममध्ये बेशुद्ध अवस्थेत आढळली. त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला असल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

गायधनी या मुंबईत पायलट म्हणून कार्यरत असताना ज्येष्ठ लेखिका सुमन मुठे आणि निवृत्त वनाधिकारी मारोती मुठे यांच्या त्या कन्या होत्या, या घटनेमुळे गायधनी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

हे देखील वाचा  : 

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

तब्बल आठ महिन्यांनी दफन केलेला मृतदेह काढला बाहेर..

 

 

Comments are closed.