Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गद्दारी शब्द त्यांच्या रक्तातच – राणेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

मुंबई, दि. १६ सप्टेंबर : वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्पाच्या वादाला आता वेगळेच वळण लागत आहे. प्रकल्पावर बोलण्याचे सोडून सत्ताधारी आणि विरोधक आता आपल्या राजकिय उखाळ्या-पाखाळ्यात गुंतले आहेत. एकीकडे हजारो कोटी रुपयांची गुंतवणूक आणि लाखोची रोजगार निर्मिती क्षमता असणारा वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातमध्ये गेला आहे. त्यावर काय तोडगा निघू शकतो ? पक्षीय मतभेद विसरून आपण महाराष्ट्रासाठी काय आणि कशाप्रकारे चांगले काम करू शकतो. हे बाजूला सारून ह्या चर्चेने आता वेगळे स्वरूप धारण केले आहे.

भाजप नेते तथा केंद्रीय सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी, उद्धव ठाकरेवर हल्लाबोल केला आहे. त्यांच्या पापामुळेच ही कंपनी राज्याबाहेर गेली, असे म्हटले आहे. एवढेच नाही, तर गद्दारी हा शब्द त्यांच्या रक्तात आहे, असेही राणे यांनी म्हटले आहे. ते माध्यमांशी बोलत होते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

शिवसेनेकडून सातत्याने वापरल्या जात असलेल्या गद्दार शब्दावरुनही राणे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. राणे म्हणाले, “गद्दार कुणाला म्हणावं, मागच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष – शिवसेना एकत्र लढले, बहुमतात आले. यानंतर उद्धव ठाकरे भाजपसोबत राहिले नाहीत. त्यांनी मुख्यमंत्री होण्यासाठी हिंदुत्वाचा त्याग केला आणि गद्दारी करूनच ते मुख्यमंत्री बनले. राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत गेले. फक्त पदासाठी. त्यांनी ही गद्दारी केली आहे. यामुळे गद्दारी हा शब्द त्यांच्या रक्तात आहे.”

हे देखील वाचा : 

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सर्वांना प्रेरणा देईल – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

शिवसेना नेते संजय राऊत यांना कोर्टाचा कोणताही दिलासा नाही.

मी राजीनामा देतो, ४० गद्दारांनी राजीनामा देऊन निवडणुकीला यावं; आदित्य ठाकरेंचे शिंदे गटाला आव्हान.

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.