Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

आदिवासीबहुल नक्षलग्रस्त भामरागडातील दोन युवक होणार डॉक्टर ; डॉ.प्रकाश आमटे व डॉ.मंदाकिनी आमटे यांनी केला सत्कार

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली २० नोव्हेंबर : या वर्षी नीट परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या आदिवासीबहुल नक्षलग्रस्त  भामरागड तालुक्यातील नारगुंडा येथील रहिवासी सुरज पुंगाटी आणि लाहेरी येथील विजय ओक्सा यांना गुरुवारी लोक बिरादरी प्रकल्प येथे स्व.लक्ष्मीबाई आमटे ट्रस्टच्या वतीने प्रत्येकी ११००० रुपयांचे बक्षीस  डॉ. प्रकाश व डॉ. मंदाकिनी आमटे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
सुरज हा हेमलकसा येथील लोक बिरादरी आश्रमशाळेचा माजी विद्यार्थी आहे. सुरजच्या यशात पुणे येथील LFU संस्थेच्या नीट प्रिपरेशन क्लासचा सिंहाचा वाटा आहे. विजय ओक्सा हा भामरागड येथील मॉडेल स्कूलचा विद्यार्थी आहे. ‘हम किसीसे कम नही’ हे सिद्ध करत या दोघांनी प्रचंड मेहनतीने नीट परीक्षा पास केली.
लोक बिरादरी प्रकल्पामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांनी मार्गदर्शन केले.
लवकरच यांना वैद्यकीय अभ्यासक्रमाला प्रवेश मिळेल अशी आशा करूया. लवकरच ते डॉक्टर होतील. आणि समाजाची सेवा करतील. त्यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा अशा शब्दात डॉ. प्रकाश व डॉ. मंदा आमटे यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.

हे देखील वाचा,

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

बीड येथे अखिल भारतीय दुसरी बौद्ध धम्म परिषद

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

पर्यावरण वाचविण्यासाठी दोन युवकांचा पुढाकार; जनजागृती करण्यासाठी सायकलने प्रवास

कार आणि दुचाकीचा भीषण अपघात; तीन ठार, एक जखमी

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.