Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

अन् बच्चुभाऊ कडू युसुफ खा पठाण बनतात तेव्हा…

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

अमरावती, दि. २२ जून : राज्याचे शालेय शिक्षण व जलसंपदा राज्यमंत्री अकोल्याचे पालकमंत्री हे आपल्या आगळ्यावेगळ्या आंदोलनासाठी प्रसिद्ध आहेत असाच प्रकार काल अकोला आणि पातुर या शहरात घडला आहे.

बच्चुभाऊ कडू यांनी वेशांतर करून प्रशासकीय यंत्रणेची झाडाझडती घेतली आहे. त्यामुळे अकोला जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणा धास्तावल्याची दिसून येत आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

बच्चुभाऊ कडू यांनी चक्क मुस्लिम समाजातील व्यक्तीचा पेहराव करून तोंडाला रुमाल बांधून विविध प्रशासकीय यंत्रणेची झाडाझडती घेतली आहे. तसेच जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकाने जिल्ह्यातील गुटखा विक्री सुरू आहे का? हे देखील त्यांनी तपासले असता यात अनेकांचे पितळ उघडे पडले आहेत.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

त्यामुळे पोलीस यंत्रणा यांना देखील धसका घेतला आहे बच्चुभाऊ कडू यांनी अकोला महापालिकेत प्रहार संघटनेच्या वतीने घरकुलासाठी आंदोलन करण्यात येत होते या आंदोलनात सहभाग घेऊन येथील प्रशासकीय यंत्रणेची चौकशी केली आहे. तसेच त्यांनी पातुर येथील कलश व एसबी या दोन पान सेंटरवर गुटका मागितला त्यामुळे तेथील पान सेंटर वाल्यांनी तुम्हाला पुष्कळ घुटका देऊ असे सुद्धा सांगितले त्यामुळे त्या पान सेंटर वाल्यांचे पितळ सुद्धा उघडे आले आहे.

त्यामुळे अशा आगळ्या वेगळ्या विषयात बच्चू कडू यांनी यंत्रणेचा आढावा घेतला आहे. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणा एकंदरीत चक्क झाली आहे.

हे देखील वाचा : 

डेल्टा प्लस विषाणूच्या तपासणीसाठी राज्यभरातून ७५०० नमुने पाठवले – आरोग्यमंत्री राजेश टोपे

LIC कन्यादान पॉलिसी: २५ वर्ष रोज १३० रुपये भरा आणि मुलीच्या लग्नासाठी मिळवा २७ लाख रुपये

रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर!,आता IRCTC मधून तिकीट रद्द केल्यावर लगेच मिळणार रिफंड

 

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.