Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

चिंचाळा येथील नालीचे निकृष्ट बांधकामाची उच्चस्तरीय चौकशी करून बांधकाम व्यवस्थित करण्याची उलगुलान संघटनेची मागणी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

चंद्रपूर : जिल्ह्यातील मुल तालुक्यातील चिचाळा येथील ग्रामपंचायत अंतर्गत नाली बांधकाम सुरु आहे. सदर नाली बांधकाम अत्यंत निकृष्ट दर्जाचे आहे. असे तेथील नागरिकांनी उलगुलान संघटनेला सांगितले. उलगुलान संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते सदर नाली बांधकामाच्या ठिकाणी गेले असता व बांधकामाची चौकशी केली असता बांधकाम अत्यंत निकृष्ट दर्जाचे आढळून आले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

सदर नाली बांधकामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असून शासन व प्रशासनाची दिशाभूल करून सदर बांधकाम केले जात आहे. बांधकामाच्या ठिकाणी कोणताही अधिकारी नियुक्त नसून बांधकामाची साधी पाहणी देखील अधिकारी करताना दिसत नाही. ही बाब अत्यंत गंभीर असून सदर कामाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषी ठेकेदार यांच्यावर कठोर कारवाई करावी करिता उलगुलान संघटनेचे मुल तालुकाध्यक्ष रोहित बोबाटे व त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी बांधकाम विभागाला निवेदन दिले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

सदर बांधकामाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कारवाई केली नाही तर उलगुलान संघटना सदर बांधकाम बंद पाडून तीव्र आंदोलन करणार असा इशारा रोहित बोभाटे यांनी संबंधित प्रशासनाला दिला.

यावेळी निवेदन देतांना उलगुलान संघटनेचे तालुकाध्यक्ष रोहित बोबाटे उपाध्यक्ष किशोर पगडपल्लिवार, देवाजी ध्यानबोईवार, शुभम टिकले, सुरज टिकले तथा अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

हे देखील वाचा :

इराणी टॅल्कम पावडरच्या कंटेनर मध्ये आढळलेले २९० किलो हेरॉईन अमली पदार्थ कस्टम विभागाने केले जप्त

अबब… कारच्या डिकीत ७० किलो गांजा

४ कोटी रुपयांची व्हेल माशाची उलटी जप्त, …विक्री करणाऱ्या दोन आरोपींना पोलिसांनी केली अटक

Comments are closed.