Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

केंद्र सरकारच्या विरोधात आज चंद्रपुरात महिला काँग्रेसचे आंदोलन

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

चंद्रपूर, दि. ९ जुलै : केंद्र सरकारच्या विरोधात आज चंद्रपुरात महिला काँग्रेसच्या वतीने निदर्शन करण्यात आले.

जिल्हाधिकारी कार्यालयापुढे हे आंदोलन करण्यात आले. यात महिला मोठा संख्येने सहभागी झाल्या.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

सध्या देशात पेट्रोल, डिझेल, गॅस आणि खाद्य तेलाच्या किमतींनी उच्चांक गाठलाय. कराच्या नावाखाली मोदी सरकारने सर्वसामान्य जनतेचे तेल काढले आहे. इंधन महागल्याने जीवनोपयोगी साहित्य महागले. या महागाईचे चटके आता लोकांना असह्य होऊ लागले. याचा निषेध करण्यासाठी आज महिला काँग्रेसतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयापुढे निदर्शने करण्यात आली.

आमदार प्रतिभा धानोरकर, राज्य सचिव नम्रता ठेमस्कर, जिल्हाध्यक्ष चित्रा डांगे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. यावेळी उपस्थित महिलांनी केंद्र सरकार आणि पंतप्रधान मोदी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

अच्छे दिनच्या नावाखाली मोदींनी जनतेला कसे मूर्ख बनवले, हेच विद्यमान स्थितीवरून दिसून येते. आणि यामुळेच केंद्राचा आम्ही निषेध करीत आहो.

आ. प्रतिभाताई  धानोरकर

हे देखील वाचा :

१२५ जणांचे हरवलेले मोबाईल शोधून देण्यात नागपूर सायबर सेलच्या पोलिसांना यश

भीषण अपघात: ट्रकच्या धडकेत कारचा चक्काचूर, अपघातात चौघांचा मृत्यू

३५० सायलेंसर आणि प्रेशर हॉर्न्स वर फिरला बुलडोजर; ठाणे वाहतूक विभागाची धडक कारवाई

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.