Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

इंधन दरवाढी विरोधात आलापल्ली येथे युवक काँग्रेसची सायकल यात्रा व निदर्शने

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

अहेरी, दि. १९ जुलै : देशात पेट्रोल, डीझेल व गँसचे दर भरमसाठ वाढत आहेत. याविरुद्ध सामान्य जनता ओरडत असूनही केंद्र शासन दुर्लक्ष करित आहे. याविरुद्ध काँग्रेसने देशव्यापी आंदोलन सुरू केले आहे.

या देशव्यापी आंदोलनाची धग गडचिरोली जिल्ह्यात पेटविण्याचे काम युवक कॉंग्रेस करित आहे. याचाच एक भाग म्हणून अहेरी युवक काँग्रेस, अहेरी तालुका व शहर काँग्रेसच्यावतीने डॉ.नामदेवराव उसंडी यांच्या नेतृत्त्वात सोमवार (19 जुलै) आलापल्ली येथे पद यात्रा काढण्यात आली.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

या सायकल यात्रेची सुरुवात विश्रामगृह आलापल्ली येतुन करण्यात आली. सदर यात्रा वीर बाबुराव चौक, मुख्य बाजापेठेतून पेट्रोल पंपावर पोहचली, पंपावर इंधन दरवाढीचा विरोध करीत जोरदार घोषणाबाजी करीत निदर्शने करण्यात आली.

या यात्रेत रवि शाह जि.प. सदस्य, पंकज गुंडेवार, अनिल कोठारे, डॉ. निसार हकीम, सुवर्णा येमुलवार, मुस्ताक हकीम, रज्जाक पठाण, रुपेश बांदेला, रोहित चेर्लावार, सतिश मडावी व काँग्रेसचे शेकडो कार्यकर्ता मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा :

औषध काळा बाजार करणाऱ्यांना खंडपीठाचा दणका; गुन्हा रद्द करण्याची याचिका न्यायालयाने फेटाळली

शाश्वत शेती विकासाचा केंद्रबिंदु – डॉ. विलास खर्चे

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.