Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

शाश्वत शेती विकासाचा केंद्रबिंदु – डॉ. विलास खर्चे

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली, दि.१९ जुलै : डॉ. व्ही.के. अर्चे, संचालक, विस्तार शिक्षण तथा संशोधन संचालक, डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला यांनी जिल्हयातील विविध विभागातील अधिकाऱ्यांशी संवाद साधून जिल्ह्यातील धान लागवडीबाबत नवीन तंत्रज्ञानाचा वापर करावा, डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला संशोधीत वाणाचा वापर करावा तसेच जिल्हयामध्ये रब्बी पिकाचे क्षेत्र वाढविण्याचे आवाहन केले जेणेकरून शेतकऱ्यांना उत्तम उत्पादन प्राप्त होऊन आर्थिक स्थैर्य लाभेल. शाश्वता शेती हाच विकासाचा केंद्रबिंदु असाल्याचे प्रतिपादन डॉ. विलास खर्चे यांनी यावेळी केले.

त्याचप्रमाणे नाबार्ड अंतर्गत कृषि विषयक विविध योजना राबविण्याचे सुचविले. तसेच कृषिविभागा अंतर्गत योजनांचे जिल्हयातील शेतकऱ्यांना फायदा करून देण्यासाठी सर्व विभागांनी मदत करावी व कृषि विज्ञान केंद्र, गडचिरोली मधील विशेषज्ञांच्या मदतीने नविन तंत्रज्ञानाची माहिती करून घ्यावी असे आवाहन केले. कृषि विज्ञान केंद्र, सोनापूर-गडचिरोली येथे शास्त्रीय सल्लागार समितीची चौदावी सभा पार पडली. सभेचे अध्यक्षस्थानी डॉ. व्ही.के. खर्चे, संचालक, विस्तार शिक्षण तथा संशोधन संचालक, डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला, डॉ. ए. व्ही. कोल्हे, सहयोगी संशोधन संचालक, विभागीय संशोधन केंद्र, सिंदेवाही डॉ. प्रकाश कडू, विभाग प्रमुख मृद विज्ञान व कृषि रसायनशास्त्र, डॉ.पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला, डॉ.माया राऊत, प्रभारी सहयोगी अधिष्ठाता, कृषि महाविद्यालय, गडचिरोली, भाऊसाहेब बऱ्हाटे, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, गडचिरोली, संदिप एस.कऱ्हाळे, कार्यक्रम समन्वयक, कृषि विज्ञान केंद्र, गडचिरोली, डॉ. शालीनी बडगे, सहयोगी प्राध्यापक (उद्यानविद्या), रा. कृ.सं.के. गडचिरोली, आर.जी. चौधरी, डी.डी.एम, नाबार्ड, गडचिरोली, सचिन अडसूळ, जिल्हा माहीती अधिकारी, डॉ. वैद्य, सहाय्यक आयुक्त, मत्सव्यवसाय, गडचिरोली, सचिन यादव, दुग्ध विकास अधिकारी, गडचिरोली, डॉ. कुमरे, पशुधन विकास अधिकारी, जिल्हा परिषद, गडचिरोली, डॉ. मेश्राम, पशुधन विकास अधिकारी, गडचिरोली, श्री. तुमसरे, कृषि विकास अधिकारी, जिल्हा परिषद, गडचिरोली, सोनाल भडके, वनविभाग, गडचिरोली, कांता मिश्रा, महिला आर्थिक विकास महामंडळ, गडचिरोली, चेतना लाटकर, उमेद तसेच प्रगतशिल शेतकरी यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. कृषि विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक, संदिप एस. काऱ्हाळे यांनी मान्यवरांचे स्वागत केले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

शास्त्रीय सल्लागार समीतीच्या १३ व्या सभेचा अहवाल सन २०२०-२१ चा प्रगती अहवाल, प्रथम रेषिय प्रात्यक्षिकांचा अहवाल, अनुनियोजीत चाचणी अहवाल तसेच बिजोत्पादन कार्यक्रम अहवाल कृषि विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक, श्री. संदिप एस. कऱ्हाळे यांनी चित्रफितीदारे (प्रेझोन्टेशनदारे ) सादर केला. डॉ. प्रकाश कडू, विभाग प्रमुख मृदू विज्ञान व कृषि रसायनशास्त्र, डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला यांनी अधिक उत्पादनाकरीता मृदा तपासणी करून जमीनीतील मुलद्रव्याची पुर्तता करने आवश्यक असल्याने सांगितले. तसेच आवश्यकतेनुसारच खताची मात्रा देण्याने उपस्थित शेतकऱ्यांना पटवून दिले. यामुळे अनावश्यक खताचा वापर टाळूण जमीनीचे आरोग्य टिकविता येईल असे प्रतिपादन केले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

सदर शास्त्रीय सल्लागार समिती दरम्यान मृदा विज्ञान कृषि रसायनशास्त्र विभाग, अ.भा.स. सुक्ष्म व दुय्यम अन्नद्रव्ये प्रकल्प,डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला यांच्या वतीने अखिल भारतीय समन्वयीत सुक्ष्म व दुय्यम अन्नद्रव्ये प्रकल्पांतर्गत अनुसूचित जातीच्या महिला शेतकरी भगीनीना फवारणी पंप तसेच धान उत्पादक शेतकरी बंधुना पीडीकेव्ही मायक्रो ग्रेड २ चे वाटप करण्यात आले. तसचे कृषि विज्ञान केंद्र, सोलापूर-गडचिरोली यांच्या वतीने समूह प्रथम रेषिय पिक प्रात्यक्षिक अंतर्गत तुर बियाणे आणि राष्ट्रीय कृषि विकास योजने अंतर्गत धान बियाणे वाटप करण्यात आले. यादरम्यान मान्यवरांनी कृषि विज्ञान केंद्र, सदर सभेस विविध कार्यालयाचे अधिकारी तसेच कृषि विज्ञान केंद्र, गडचिरोली येथील विषय विशेषज्ञ व कर्मचारी पुष्पक ए. बोथीकर, विषय विशेषज्ञ (पिक संरक्षण), ज्ञानेश्वर ताथोड, विषय विशेषज्ञ (कृषि अभियांत्रियी), डॉ. विक्रम कदम, विषय विशेषज्ञ (पशु य दुग्धशास्त्र), श्री. एका पी. बुध्देवार, विषय विशेषज्ञ (कृषि हवामान शास्त्र), निलीमा पाटील, विषय विशेषज्ञ (गृहविज्ञान), दिपक चव्हाण सभेस उपस्थित होते.

हे देखील वाचा:

आपत्ती व्यवस्थापनाच्या अनुषंगाने सावधानतेचा इशारा

संभाव्य तिसऱ्या लाटेपूर्वी जिल्ह्यात ऑक्सीजन प्लाँटचे काम पूर्ण करा – पालकमंत्री वडेट्टीवार

 

Comments are closed.