Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

देसाईगंज शहरात समाजवादी पक्षाचा वाढता प्रभाव बघता शेकडो नागरिकांचा पक्षात प्रवेश

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

देसाईगंज : समाजवादी पार्टी जिल्हा गडचिरोली यांच्या देसाईगंज येथील स्थानिक विश्राम गृह येथे आयोजित कार्यक्रमात समाजवादी पक्षाची विचारधारा आत्मसात करीत समाजवादी पक्षाचे जिल्हा अध्यक्ष इलियास खान यांच्या नेतृत्वात आज शेकडॊ युवा नागरिकांनी समाजवादी पक्षात प्रवेश केला.

या कार्यक्रमाला प्रामुख्याने समाजवादी पार्टी महाराष्ट्र प्रदेश महिला विभाग अध्यक्षा मायाताई चव्हरे, ईज़हारअली सचिव महाराष्ट्र समाजवादी पार्टी तसेच मुश्ताक खान आणि बंटी अलेक्ज़डर, गडचिरोली जिल्हा उपाध्यक्ष आमीर यासिणि, जिल्हा संघटक राजेश पतरंगे- आदी उपस्थित होते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

सदर समाजवादी पक्षाच्या कार्यक्रमात देसाईगंज तालुका अध्यक्ष पदावर फैजाण अल्ताफ पटेल, उपाध्यक्ष पदावर सय्यद दानिश सय्यद वकील अहेमद, तालुका सचिव पदावर प्रितम अंबरदास जणबंधू, तालुका सहसचिव पदावर राहुल सिडाम, तालुका कोषाध्यक्ष पदावर तवंगर फारूक कुरेशी, तालुका संघटक पदावर मो.वसिम आघाडी तर प्रसिद्धी प्रमुख पदावर जीब्राइल शेख आणि तालुका संघटक सचिव या पदावर फैजाण इक्बाल शेख यांची नियुक्ती करण्यात आली आहे तसेच देसाईगंज तालुक्यात भविष्यात समाज हिता करिता आंदोलन उभे करणार असल्याची माहिती पदाधिकाऱ्यांनच्या वतीने देण्यात आली आहे.

हे देखील वाचा :

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

राज्यावरील पुराचे संकट; … या आपत्तीत महाराष्ट्र शोकाकुल असून कुणीही माझा वाढदिवस साजरा करू नये : मुख्यमंत्र्यांनी केले आवाहन

गडचिरोली जिल्ह्यात आज 7 कोरोनामुक्त तर 8 नवीन कोरोना बाधित

स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या आस्थापनेवर GD कॉन्स्टेबल पदाच्या एकूण 25271 जागांसाठी मेगाभरती

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.