Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

राज्य शासनाच्या रासेयो पुरस्कारात गडचिरोलीतील गोंडवाना विद्यापीठाचा डंका

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली 12ऑगस्ट :राज्य शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने २०२०-२१ या वर्षाकरिता आज राष्ट्रीय सेवा योजनेचे पुरस्कार जाहीर केले आहेत. गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठाला सर्वोत्कृष्ठ विद्यापीठाचा पुरस्कार मिळाला असून, इतर पुरस्कारही याच विद्यापीठाने काबीज केले आहे.

राष्ट्रीय सेवा योजनेंतर्गत २०२०-२१ या वर्षात नि:स्वार्थ भावना व निष्ठेने समाजाची सेवा करणाऱ्यांना त्यांच्या अंगीकृत कामात प्रोत्साहन मिळावे, तसेच त्यांच्या सेवेचा गौरव व्हावा, या हेतूने १९९३-९४ पासून पुरस्कार देण्यात येतो. यंदा राज्यस्तरीय पुरस्कार निवड समितीच्या शिफारसीनुसार गोंडवाना विद्यापीठाला सर्वोत्कृष्ठ विद्यापीठाचा पुरस्कार प्राप्त झाला आहे. स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. सर्वोत्कृष्ठ कार्यक्रम समन्वयक म्हणून गोंडवाना विद्यापीठाचे डॉ.नरेश मधुकर मडावी यांना पुरस्कार जाहीर झाला आहे. स्मृतिचिन्ह व १० हजार रुपये रोख असा हा पुरस्कार आहे.
सर्वोकृष्ट कार्यक्रम अधिकारी म्हणून गोंडवाना विद्यापीठांतर्गत राजुरा येथील श्री. शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे गुरुदास दादाजी बल्की यांना पुरस्कार जाहीर झाला आहे. स्मृतिचिन्ह व ५ हजार रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.
सर्वोकृष्ट महाविद्यालयाचा पुरस्कार गोंडवाना विद्यापीठांतर्गत राजुरा येथील श्री. शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय यांना जाहीर झाला आहे स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

उत्कृष्ठ स्वयंसेवक पुरस्कारांमध्ये गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी येथील महात्मा गांधी कला, विज्ञान व नसरुद्दीन पंजवानी वाणिज्य महाविद्यालयाची विद्यार्थिनी प्रियंका शामराव ठाकरे यांचा समावेश आहे

हे देखील वाचा :

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागातील तीन नवीन पुलांच्या बांधकामांना व रस्त्यांना मंजूरी

 

 

तस्करी मध्ये पकडलेली ६४ दुर्मिळ प्रजातीची कासवे वनविभागमार्फत गुवाहाटी येथे मूळ अधिवासात हवाई मार्गे (Air Lifted) रवाना

 

पत्नीने पाठलाग करून नवऱ्याच्या सोबतच्या मैत्रिणीला धु धु धुतले, घटनेचा व्हिडिओ व्हायरल…

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.