Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

महिलांवरील अत्याचार थांबू दे, सगळ्यांना सुबुद्धी दे, यशोमती ठाकूर यांचे महालक्ष्मीला साकडे

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

अमरावती, दि. १३ सप्टेंबर:  राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री एडवोकेट यशोमती ठाकूर यांनी आज अमरावती येथील त्यांच्या निवासस्थानी गौरी आवाहन केले. महालक्ष्मीची स्थापना करून महालक्ष्मीकडे राज्याच्या सुख-समृद्धीसाठी साकडे घातले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

“आदिमाया, आदिशक्ती, महालक्ष्मी राज्यातील प्रत्येक माणसाच्या घरात धनधान्य, सुखसौख्य, समृद्धी नांदू दे यंदा पाऊसकाळ चांगला झालाय अशीच तुझी कृपा राहू दे अतिवृष्टीने बाधित झालेल्या शेतकऱ्यांना लढण्याचं बळ दे. बळीराजाला जसं पावसाचं दान दिलं, तसंच राज्यातील कोविडची महामारी लवकरात लवकर दूर कर केंद्रातल्या अन्याय सरकारने वाढलेली महागाई आणि बेरोजगारी लवकरात लवकर कमी कर. मुख्य म्हणजे या राज्यातील माय भगिनींच्या पोषणासाठी, सशक्तीकरणासाठी, सक्षमीकरणासाठी झुंजण्याचे बळ दे. महिलांवरील अत्याचार थांबू दे, सगळ्यांना सुबुद्धी दे माय, माय भगिनींच्या रक्षणासाठी सरकारचे हात अधिक मजबूत कर ग माय”. अशा शब्दात महालक्ष्मी मातेकडे राज्याच्या हितासाठी ठाकूर यांनी साकडे घालून प्रार्थना केली.

हे देखील वाचा :

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

वाघाला जेरबंद करण्यासाठी तात्काळ उपाययोजना करण्यासाठी वनाधिकार्याना खा.अशोक नेते यांचे निर्देश

सणासुदीच्या काळात भेसळखोरांवर कडक कारवाई करा : डॉ. राजेंद्र शिंगणे

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.