Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

पतंग पकडण्याच्या नादात चिमुकल्याने गमावला जीव

चंद्रपूर शहरातील बाबुपेठ येथील घटना.

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

चंद्रपूर, दि. २८ डिसेंबर :  पतंग पकडण्याच्या नादात एका ८ वर्षाचा चिमुकला धावत सुटला आणि धावता धावता तोल जाऊन खोल पाण्याचा खड्ड्यात जाऊन पडल्याने त्याचा जीव गेला. ही हृदयद्रावक घटना सोमवारी दि. २७ डिसेंबर रोजी चंद्रपूर शहरातील बाबुपेठ येथे जुनोना चौकात घडली आहे.

बुद्ध नगर येथील सौरभ अजय कन्नोजवार असे मृत मुलाचे नाव आहे. सौरभ शाळेतून आल्यावर घराबाहेर खेळासाठी गेला होता. मात्र तो संध्याकाळ पर्यत घरी न आल्याने कुटुंबीयांनी त्याचा  शोध घेतला असता जुनोना चौक परिसरातील खोल खड्ड्यात त्याची चप्पल आढळून आली.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

यानंतर या घटनेची माहिती कुटुंबीयांनी पोलिसांना देताच पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता रात्री रेस्क्यू पथकसह घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर सौरभचा मृतदेह पाण्याचा खड्ड्यातुन  बाहेर  काढण्यात आला. मृतदेह  उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथे पाठविण्यात आला.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

या घटनेमुळे बाबुपेठ  येथील जुनोना चौक परिसरात शोकाकुल वातावरण पसरले आहे. पुढील तपास रामनगर पोलीस करीत आहे.

हे देखील वाचा : 

राज्यपालांनी राजकारण करु नये, संविधानिक पदाचा मान राखावा ! : नाना पटोले

सुरजागड लोह खदान रद्द करुन पेसा कायद्यांतर्गत मिळालेले हक्क अबाधित राखण्यात यावेत – आमदार भाई जयंत पाटील यांची विधानपरिषदेत मागणी

मुंबई उच्च न्यायालयाच्या आस्थापनेवरील लिपिक पदांच्या एकूण २४७ जागांंसाठी भरती

 

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.