Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

महाराष्ट्राची “हास्य जत्रा” सिनेकलाकारांना पावसाळी पिकनिकची भुरळ !

महिनाभराच्या विश्रांतीनंतर शूटिंग सुरू होण्यापूर्वी पनवेलच्या आगरी कोळी जेवणा चे आस्वाद घेत सुट्टीत केली धमाल...

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

मुंबई ४ जुलै :- पावसाळा म्हटलं की विकेंडला सर्वांची पाउलं रिसॉर्ट, फार्म हाऊस, धबधब्याच्या दिशेने वळतात. मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या पनवेलच्या निसर्ग सौंदर्याचा आनंद लुटण्यासाठी आता पर्यटकांचा ओढा वाढतो आहे. आणि विशेष म्हणजे याला मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्री, अभिनेतेही अपवाद राहिलेले नाहीत.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

सिनेमा, वेबसिरीज, मालिकांचे शूटिंग, नाटकांचे प्रयोग, आदी कामाच्या व्यस्त शेड्युल मधून रिलॅक्स होण्यासाठी सुप्रसिद्ध अभिनेत्री आणि निर्मात्या विशाखा सुभेदार, सोनी मराठी वाहिनीवरील “महाराष्ट्राची हास्यजत्रा” या कार्यक्रमातील विनोदी अभिनेता पॅडी कांबळे, अरुण कदम, चेतना भट, वनिता खरात, रसिका वेंगुर्लेकर, रोहित माने, हास्ययजत्रेचा बँड लिडर संगीतकार अमीर हडकर आणि वादक श्याम बांगर, आशिष महाडिक, किशोर मोहिते, गायिका मोनल कडलक, सुप्रसिद्ध गीतकार मंदार चोळकर, दिग्दर्शक अनिरुद्ध शिंदे या सर्व मंडळींनी आपापल्या कुटुंबीयांसमवेत पनवेलमधील एका फार्म हाऊसवर सुट्टीचा मनसोक्त आनंद लुटला. इथल्या खास आगरी कोळी पद्धतीच्या जेवणावर ताव मारला. यावेळी गप्पा, गोष्टी, कविता, किस्से, गाण्यांची मैफल चांगलीच रंगली होती.

हे देखील वाचा,

 

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

भाजपचा आयटी सेलप्रमुख तोएबाचा दहशतवादी ; जम्मूतील अटकेच्या कारवाईतून धक्कादायक खुलासा

 

 

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.