Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

स्व. अजय टोप्पो (शेतकरी) कुटुंबियांची माजी आमदार दिपक दादा आत्राम यांच्याकडून सांत्वन व आर्थिक मदत

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

एटापल्ली, दि. १६ सप्टेंबर : तालुक्यातील मलमपडी येथील युवा शेतकरी अजय दिलराम टोप्पो यांनी आठवडापूर्वी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. यामुळे मृतकाचे आई वडील,पत्नी दोन मुले असा मोठा परिवार उघड्यावर पडला.

आज आविस नेते व माजी आमदार दिपक दादा आत्राम यांनी आपल्या कार्यकर्त्यां समवेत एटापल्ली तालुक्यातील मलमपडी या गावाला जाऊन आत्महत्या केलेल्या युवा शेतकरी अजय टोप्पो यांचा घरी भेट देऊन कुटुंबियांची सांत्वन करून आर्थिक मदत दिली.
माजी आमदार यांच्याकडून आर्थिक मदत मृतकाचे पत्नी उर्मिला टोप्पो,,मुलगा रोशन टोप्पो,आई पंणमिक्षी टोप्पो,भाऊ जगतपाल टोप्पो यांनी स्वीकारली.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

यावेळी माजी आमदार आत्राम यांचे सोबत माजी जि.प.सदस्य व आविस युवा नेते संजुभाऊ चरडुके,आविस तालुका उपाध्यक्ष श्रीकांत चिप्पावार, माजी पं. स.सदस्य रमेश तोरे, माजी सरपंच विजय कुसनाके,संदीप बडगे, ग्रा.प.सदस्य अजय मडावी, दिलीप आलम, अशोक बडा, अजित बखळा, श्यामराव कुमरे,आनंद बखळा आदी उपस्थित होते.

हे देखील वाचा : 

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

कॉमन ड्रेस कोडची मागणी सुप्रीम कोर्टाने फेटाळली

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.